Skip to content

वकीलवाडी परिसरात मोबाईल दुकान फोडण्याचा चोरट्यांचा डाव अयशस्वी


नाशिक – शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या वकीलवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांकडून मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला गेला. ही सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

एम.जी.रोड, वकीलवाडी परिसरात मोबाईल व इलेक्ट्रोनिक अॅक्सेसरीजची दुकाने असल्याने हा भाग इलेक्ट्रोनिक अॅक्सेसरीजची बाजारपेठ म्हणून ओळखली जाऊ लागली. ह्याच भागात असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न काही चोरट्यांकडून केला जात होता. मात्र, तेथील सुरक्षारक्षकाच्या सजगतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला.

ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून एका पॉश गाडीतून हे चोरटे आले होते. यावेळी चोरट्यांनी कार दुकानासमोर उभी करून त्यातील तीन तरुण हे गाडीतून उतरले व हे सर्व त्यांच्या हातातील लोखंडी वस्तूच्या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संकुलातील पहिल्या माळ्यावर उभा असलेला सुरक्षारक्षकाने चोरट्यांना बघताच ते धावत आरडाओरड करत आले व त्या चोरट्यांनी गाडीसाहित तेथून पळ काढला.

दरम्यान, सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती कळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच दुकानमालकाला ह्याची माहिती मिळाल्यानंतर तेही वेळेत हजार झाले. पोलिसांनी घटनास्थळ व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या माध्यमातून त्या चोरट्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, त्या चोरट्यांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!