Mlg news : मालेगाव शहरासह ग्रामीण भागाचा झपाट्याने होणाऱ्या विकासात आज मोठी भर पडली आहे. मंत्री भुसे यांनी मालेगांवकरांना आरोग्यवर्धक ‘दिवाळी गिफ्ट’ दिले आहे. शहरातील सामान्य रुग्णालयात 200 खाटाहून 300 खाटाना मंजुरी देण्यात आली. यात नव्याने 100 खाटांची भर तर दाभाडी येथील ग्रामीण रग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर उभारण्याची मंजुरी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. या निर्णयासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत मालेगावच्या आरोग्य सेवेत भर टाकण्याचे काम केले आहे.
नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांना प्राधान्य देत कामांचा निपटारा करण्यावर भर दिला आहे. मंत्री भुसे हे आरोग्याला विशेष महत्त्व देत असून याचाच परिपाक म्हणून मालेगाव तालुक्याच्या विकासात अजून भर पडली आहे. मालेगाव तालुक्यातील नागरिकांना याचा येणाऱ्या काळात मोठा फायदा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने नागरिकांनी या निर्णयानंतर समाज माध्यमातून मंत्री भुसे यांचे आभार मानले आहेत
Maharashtra | राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
तालुक्यातील दाभाडी येथील ग्रामीण रग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्याबाबतची मागणी मंत्री भुसे यांनी शासन दरबारी लावून धरली होती. या मागणीचा पाठपुरावा करून शासनाच्या विचाराधीन असलेला हा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. आजच्या शासन निर्णयात ग्रामीण रुग्णालय, दाभाडी येथे २० खाटांचे ट्रामा केअर सेंटरची स्थापना करण्यास विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. या ट्रामा केअर सेंटरसाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करणे बाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल असा आदेश आज पारित करण्यात आला.
तसेच सामान्य रुग्णालय मालेगांव येथे वाढीव खाटा मिळण्या बाबत मंत्री दादाजी भुसे यांनी मागणी केली होती. मंत्री भुसे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर आजच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी उपरोक्त दि. २०.०७.२०२३ च्या पत्रान्वये सामान्य रुग्णालय मालेगांव येथील २०० खाटांवरून ३०० खाटांचे सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याची मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासंदर्भात आज शासन निर्णय झाला असून सामान्य रुग्णालय मालेगांवचे २०० खाटांवरून ३०० खाटांचे सामान्य रुग्णालयामध्ये मंजुरी विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. श्रेणीवर्धीत सामान्य रुग्णालयाचे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती शासन आदेशात देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम