Nashik News | नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी व शेतकऱ्यांनी पाणी देण्यास विरोध केला आहे. मराठा आरक्षणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना त्यात पाणी सोडल्यास विरुद्ध नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीसंघर्ष निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून सध्या पाणी न सोडण्याच्या तोंडी सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनाला लेखी आदेशाची प्रतीक्षा असून, जिल्हाधिकारी बुधवारी नाशिकमध्ये आल्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मराठा आंदोलनामुळे राज्यात वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातून तीन टीएमसी, आणि नगर जिल्ह्यातून साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश सोमवारी प्राप्त झाले आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्याची तयारी केली आहे.
Nashik News | इंडियन ऑईल मालक,चालक आणि वाहकांचा बंद; इंधन पुरवठा विस्कळीत..
कुठल्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचे जलसंपदा विभागाला आदेश दिले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश असले तरीही जिल्हाधिकारी नाशिकमध्ये नसल्यामुळे ते आल्यानंतरच याबाबत निर्णय होणार आहे.
पुढे काय?
पाणी सोडले नाही तर न्यायालयाचा अवमान होईल आणि पाणी सोडले तर जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या रागाला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हाधिकारी नाशिकमध्ये आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे कारण सध्या सांगण्यात येत आहे. ह्या निर्णयाला स्थगिती द्यायची झाल्यास, तसेच लेखी आदेश लागतील.
मंत्रालय बैठक
जायकवाडीला पाणी सोडण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून, यासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठक बोलविली आहे. या बैठकीत जर, पाणी सोडण्यास स्थगिती देण्याचा निर्णय झाला. तरच, नाशिकचे पाणी वाचेल. त्यासाठी आता नाशिक जिल्ह्यातील आमदार पुढे आले आहेत.
रविवार कारंजासह चौकात CCTV चा असणार वॉच; प्रभाग तेरासाठी शासनाकडून एक कोटीचा निधी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम