Nashik : नाशिक शहरासह जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व असल्याच नेहमीच बोललं जातं. मात्र ग्रामीण भागात अजून देखील काँग्रेस पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याच बघायला मिळत. मात्र आता शहरी भागात काँग्रेस शहर कमिटी जम बसवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. यातच आता काँग्रेसने मोठी झेप घेत भाजपचा कट्टर शिलेदार आपल्या गटात शामिल करून घेतल आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
या पक्षाप्रवेशात प्रामुख्याने भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांचा समावेश आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे स्पष्टीकरण हिरे कुटुंबियांकडून देण्यात आले आहे.
राज्यातील सत्ताधारी शिवसेना व भाजपकडून राज्यभरात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच, नाशिकमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांना पक्षात प्रवेश दिला आहे यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
दरम्यान मुंबई येथे झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात आमदार हिरे यांची बंधू भालचंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, सिडकोतील सुमित सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा प्रवेश संपन्न झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम