Nashik | आमदार खोसकर आले अडचणीत; नाशकात चर्चाना उधाण.. नेमकं काय घडलं?

0
22

Nashik | ‘मतदारसंघाच्या कामासाठी ठीक आहे.  मात्र थेट व्यासपीठावरच जाऊन बसणे योग्य नसून इतर पक्षांच्या बैठकीत जाताच कशाला, असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित करत आमदार हिरामण खोसकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच हिरामण खोसकर फार आनंदी आहेत. त्यांना काँग्रेस हाच पर्याय आहे मात्र काही लोक आपल्याला पालकमंत्री होता यावं म्हणून आपली गिणती लावत असल्याचा प्रत्यक्ष टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट)छगन भुजबळांना लगावला आहे. (Nashik)

Dasra Melava | शिंदेंनी घेतली माघार; शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा?

काँग्रेसचे आमदार असतानादेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) व्यासपीठावरील उपस्थितीमुळे त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार खोसकर अडचणीत आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेले नाना पटोले यांनी हिरामण खोसकर यांची चांगलीच कानउघाडणी केली. ‘इतर पक्षांच्या बैठकीत जाताच का? असा सवाल करीत तुमचे वर्तन पक्षविरोधी असल्याचा इशाराही पटोले यांनी खोसकर यांना सल्ला दिला. तसेच जिल्हाभर पक्षाच्या बैठकी येऊन संघटनात्मक बांधणी करा, सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात बोला असा आदेशच नाना पटोले यांनी खोसकर यांना दिलेला आहे. काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोसकर यांची खरडपट्टी काढल्यावर हिरामण खोसकर यांनी व्यासपीठावरच पटोलेंना हात जोडत पक्षाचा आदेश म्हणून जिल्हाभर बैठकी घेणार असल्याचे आश्वासनदेखील दिले.

नाशिक जिल्ह्यातील 15 आमदारांपैकी काँग्रेसचा एकमेव आमदार म्हणून खोसकर निवडून आलेले आहेत. पण खोसकर काँग्रेसचे ‘तरी त्यांचा ‘कनेक्ट’ काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसोबत राहिलेला आहे. त्यामुळे हिरामण खोसकर यांच्याबाबतीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या काही तक्रारी आहेत. त्याचा स्फोट सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीत पाहायला मिळालेला आहे. माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांनी हिरामण खोसकर यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या आहेत. त्यावर नाना पटोले यांनी आमदार खोसकर यांना सकाळी बोलावून घेत तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहात. कामासाठी गेलात ही वेगळी गोष्ट आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणे योग्य नसून त्यांच्या व्यासपीठावर दिसता कामा नये. असा सज्जड दमच नाना पटोले यांनी दिलेला आहे. यावेळी आमदार खोसकर यांनी आपला पक्ष आदेश पाळणार असल्याचे सांगत मतदारसंघात निधी आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे. पण पक्ष बांधणीसाठी जिल्हाभर फिरणार असून माझ्यावर काही मतदारसंघाची जबाबदारी द्यावी. मी पक्षाचे आमदार निवडून आणेन, अशी ग्वाही यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेली आहे.

मॉन्सुनचा फटका शेतीच्या उत्पादनावर; खरीप हंगामाचं काय होणार?

या दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, पक्षशिस्त किंवा इतर गोष्टींबाबत अध्यक्ष म्हणून माझे ते कामच आहे. बैठकीत हिरामण खोसकरच नाही तर अनेक पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आमदार खोसकर फार आनंदी आहे. त्यांना काँग्रेस हाच पर्याय उपलब्ध आहे. काही लोक आपल्याला पालकमंत्री होता यावं म्हणून आपली गिणती लावत असतात असा प्रत्यक्ष टोला नाना पटोले यांनी मंत्री छगन भुजबळांना लगावला आहे. कारण काही दिवसांपूर्वी याच प्रकरणावरून हिरामण खोसकर आमचेच असल्याचे भुजबळांनी म्हटले होते. त्यानंतर अजित पवारांच्या दौऱ्यात हिरामण खोसकर दिसले होते. त्यावरून नाना पटोले यांनी खोसकर यांना चांगलेच सुनावलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here