Skip to content

भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड लडत सुरूच, निकालाची उत्सुकता ताणली


मुंबई : राज्यसभा निवडणुकी नंतर आता विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडी आणि भाजप मध्ये अत्यंत शर्थीच्या लढाईत सुरूच आहे. अखेरपर्यंत भाजपचे प्रसाद लाड पराभूत अशी शक्यता वर्तवली जात होती. भाई जगताप (MLA election results)  जिंकतील असे चिन्ह दिसत होती.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील अतिरिक्त मतांचा फायदा काँग्रेसच्या भाई जगताप यांना होईल, असं वाटत होतं. मात्र भाजपने दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर पुन्हा एकदा आपला उमेदवार निवडून आणला.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात उभे होते. आज सकाळपासून राज्यातील २८५ आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. विधान परिषदेचं मतदान गुप्त पद्धतीनं होत असल्यामुळे शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता ताणली गेली.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीनेही काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या भवितव्याबाबत निश्चितच प्रश्न उभा राहणार आहे.

यापूर्वी देखील भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा विधान परिषदेचा सामना रंगला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या जागेवर काँग्रेसकडून भाई जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून प्रसाद लाड उमेदवार उभे होते.

मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली भूमिका बदलत भाई जगताप यांना निवडून दिले. येथे प्रसाद लाड यांचा पराभव झाला आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!