महर्षी वाल्मिकी आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

0
32

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील सर्वतीर्थ शिक्षण प्रसारक संस्थेच्या महर्षी वाल्मिकी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत बुधवार ता.२५ सायंकाळी ०६ वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी औक्षण करत स्वागत केले तद्नंतर देवी सरस्वती देवीचे व संस्थेचे सर्वेसर्वा माजी आमदार स्वर्गीय यादवराव आनंदराव बांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन कँडल मार्च ने पूजन करण्यात आले. त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह भ प निलेश गाढवे पाटील,सर्वतीर्थ शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष वेणूताई यादवराव बांबळे, सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे, संस्थेचे सरचिटणीस वसंतराव डामसे,जेष्ठ नागरिक आबाजी बारे,संचालक विलास यादवराव बांबळे, माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ धादवड, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, उद्योजक नंदू जाधव, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद चे प्राचार्य तुकाराम साबळे, वॉटर फौंडेशनचे सोमनाथ गोसावी ,जेष्ठ विज्ञान शिक्षक श्रीराम लोहार,जेष्ठ पत्रकार शिक्षक जनार्धन परदेशी, डॉ संजय बांबळे आदींसह उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने पुष्पहार शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी त्र्यंबकेश्वर संस्थांनचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील यांनी भूषविले.त्याला सूचक सुनील गाढवे तर अनिमोदन शिक्षक ताराचंद मेतकर यांनी दिले. प्रास्ताविक प्राचार्य रमेश पठाडे यांनी केले.त्यानंतर पुढील सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक ताराचंद मे तकर यांनी केले व लगेचच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते नवीन शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२२/२३ या वर्षाच्या पूर्वसंदेतील विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रिले ,तीन पाय शर्यत, धावणे, भाला फेक, दहा मीटर रिले, विविध स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणात मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पंचवीस वर्षात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यानंतर आम्ही सावित्रीच्या लेकी या भाषण शैलीत शालेय विद्यार्थ्यांनी घाणे हिने कार्यक्रमाला साद घातली. प्राचार्य तुकाराम साबळे,सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, उद्योजक नंदू जाधव यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण ह भ प निलेश महाराज गाढवे पाटील यांनी शक्ती जीवन आहे , प्रेम जीवन आहे इच्छा आकुंचन आहे, तरुण जर दुरबल आहे तर या राष्ट्राचा विनाश आहे,
आजचा पाल्य उद्याचा देशाचा एक सुधारित भाग आहे.

कला आणि आध्यात्म ही आपल्या पाल्यांमध्ये पालक आणि शिक्षकांनी रुजवावी,संत कलेचे ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी द्यावेत, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पूढे जाऊन मोठा होणार असतो आयुष्यात कलेची जोड असुद्यात अश्या भाषा शैलित त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती नाथ महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह भ प निलेश गाढवे पाटील यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव माजी आयुक्त वसंतराव डामसे यांनी आभार प्रदर्शनपर भाषण केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापक रमेश पठाडे, विज्ञान शिक्षक ताराचंद मेतकर, अनिल पाटील,संजय साबळे, सविता पाटील, विठाबाई मडके, सुनील गाढवे, गणेश नेहे, किरण बरे, प्रकाश शिरसाठ, सानिया दुबे, अशोक वाकचौरे, संजय देवरे, अनिल पगारे,
आदीसह बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here