देवळा: येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश नेरकर तर व्हा चेअरमन पदी केतन लुंकड यांची निवड करण्यात आली. या पतसंस्थेची सन-२०२३ ते २०२८ वर्षाकरीता संचालक मंडळाची निवडणूक संस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.
आज बुधवार दि ७ रोजी दुपारी ३ वाजता संस्था कार्यालयात चेअरमन, व्हा चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी चेअरमन पदी सुरेश दगा नेरकर यांची तर व्हा चेअरमन पदी केतन पारसमल लुंकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी माजी चेअरमन व विद्यमान संचालक अजय शांताराम मेतकर, संतोष शिवाजी शिंदे , विष्णू सुखदेव जाधव ,तेजस विजय मेतकर ,जाकीर शब्बीर शेख ,शुभांगी ज्ञानेश्वर मेतकर, माधुरी दिलीप मेतकर, नितीन प्रकाश शिंपी ,गिरीश रमेश कचवे ,नानाजी निंबा चंदन आदींसह व्यवस्थापक संदिप देवरे , भुषण शिरसाठ ,ज्ञानेश्वर मेतकर ,संदिप भामरे उपस्थित होते .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी नितीन तोरवणे यांनी कामकाज बघितले .नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे चालकांचे देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर,मविप्रचे संचालक विजय पगार , संचालक भाऊसाहेब पगार ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर , गटनेते संभाजी आहेर, कमकोचे चेअरमन योगेश महाजन, संचालक गजानन सोनजे ,भारत कोठावदे राजेंद्र सोनजे ,डॉ ललित मेतकर आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम