Skip to content

जैन इरिगेशन कंपनी व रीवूलीस आंतरराष्ट्रीय कंपनीचे एकत्रीकरण


जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, आणि टेमासेक-मालकीच्या रीवूलीस पीटीई लिमिटेड., सिंगापूर यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग बी.व्ही. (जैन इरिगेशनची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी) आणि रीवूलीस यांच्यात निश्चित व्यवहारिक करार केला आहे. जैन इरिगेशनचा इंटरनॅशनल इरिगेशन बिझनेस (“आय.आय.बी.”) यापुढे रीवूलीसमध्ये विलीन करून जागतिक सिंचन आणि हवामान महासत्ता तयार केली जाईल, जी जगातील सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची असेल आणि ज्याचा महसूल ७५० दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयात 5800 कोटी) इतका असेल. या रोखी आणि स्टॉक व्यवहारातून पुढील गोष्टी साध्य होतील.

 

या व्यवहारात रोख रकमेचा उपयोग जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज ४५% ने कमी करण्यासाठी केला जाईल, ज्याद्वारे जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची घट होण्यास मदत होणार आहे. ज्यात २२५ दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयांत 1757 कोटी) पर्यंतच्या सर्व पुनर्रचित विदेशी बॉन्डचा आणि आय.आय.बी. समाविष्ट असलेल्या विदेशी ऑपरेटिंग कंपन्यांच्या संपूर्ण कर्जाचा समावेश आहे. विलीन झालेल्या संस्थेत जैन इंटरनॅशनल बिझनेस २२% ची भागीदारी कायम ठेवेल आणि राहीलेली ७८% टेमासेक कडे असेल. जैन इरिगेशनने बॉण्डधारक व आय.आय.बी कर्जदारांना दिलेली २,२७५ कोटी रुपयांची कॉर्पोरेट हमी देखील सोडवण्याची संधी जैन इरिगेशनला मिळेल. विलीन झालेल्या संस्थेसोबत जैन इरिगेशनचा दीर्घकालीन पुरवठा करार असेल. यामुळे महसूल आणि नफा वाढण्यास मदत होईल. विलीन झालेली संस्था प्रख्यात जैन ब्रँड्सचा वापर आणि प्रचार लक्षणीय उपस्थिती, मागणी, मूल्य असलेल्या मार्केट्समध्ये सुरू ठेवेल. प्रशासनाच्या दृष्टीने, कंपनीच्या संचालक मंडळावर जैन इरिगेशनचे प्रतिनिधी संचालक व निरीक्षक असतील आणि सूक्ष्म सिंचनातील त्यांच्या कौशल्याचा उपयोग कंपनीच्या वाढीस मदतीचा ठरेल. जागतिक सिंचनक्षेत्रात जैन इरिगेशन संभाव्य भावी मूल्य निर्मिती राखून ठेवेल. तसेच जैन इरिगेशन जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिंचन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतीय व्यवसायात आणखी सुधारणा करेल. यातून व्यवसायाचा विस्तार होऊन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. या कराराद्वारे अलीकडील पुनर्गठनात आर्थिक संघटनांशी सहमती केल्यानुसार भारतीय व्यवसायाच्या ताळेबंदावरील कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.

विलीगीकरणाची ठळक वैशिष्ट्ये –

७५० दशलक्ष यु. एस. डॉलर्स महसूल असणाऱ्या या एकत्रिकरणाचा मार्केट विस्तार सहा महाद्वीप व ३५ देशांमध्ये नावीन्यता, डिजिटल तंत्रज्ञान व शाश्वता यावर आधारित असेल.

जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रीव्युलीस मधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आणि मार्च २०२२ मध्ये पूर्ण मालकी स्वीकारली.

हा व्यवहार म्हणजे आंतराष्ट्रीय आणि भारताच्या ताळेबंदातील कर्ज लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी (डीलिव्हरेजिंग ऑफ बॅलेन्सशीट) आणि वेगाने वाढणाऱ्या भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या जैन इरिगेशनच्या प्रयत्नातील दुसरा टप्पा आहे.

 

“शाश्वत आणि प्रभावी हाय-टेक कृषी व्यवसाय निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आमच्या मूल्यांशी मिळतीजुळती मूल्ये जपणाऱ्या टेमासेक या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुंतवणूक कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, रीवूलीस सोबतच्या विलीनीकरणामुळे जागतिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी सज्ज होईल. भौगोलिक पाऊलखुणा, आमच्या विस्तारीत सेवा आणि उत्पादने, तसेच तांत्रिक आणि सूक्ष्म सिंचनातील कौशल्यांची जोड लाभली आहे. यामुळे पर्यावरण बदल आणि अन्न सुरक्षा आव्हानांना शाश्वत उपायांसह तोंड देण्यास, तसेच उत्पादकांसाठी पाणी कार्यक्षमता आणि उत्पादकतेसाठीच्या महत्त्वपूर्ण ज्ञान हस्तांतरणासाठी आपण सक्षम होऊ. या मूल्यवर्धित दीर्घकालीन संबंधांमुळे कृषी आणि अन्न परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण सकारात्मक प्रभाव निर्माण होईल, अशी आम्हाला अशा आहे. तसेच, टेमासेक सोबत आम्ही भावी अन्न आणि शेतीसंबंधी इएसजी, हाय-टेक कृषी इनपुट, तंत्रज्ञानातील नाविन्यता, तसेच अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या फायद्यासाठीच्या उपायांसह संयुक्तपणे सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी उत्सुक आहोत.”

– अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

 

 

“जगभरातील सिंचन बाजारपेठांच्या वाढत्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने आम्ही आनंदित झालो आहोत. मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या अर्थव्यवस्था आणि समर्पित, वैविध्यपूर्ण कर्मचारी पाया यांचा लाभ घेत असताना, आमच्या उत्पादक समुदायासाठी आणि एकत्रित व्यावसायिक भागीदारांप्रती असलेल्या सर्व वचनबद्धता पाळण्याची आणि त्या आणखी मजबूत करण्याची आम्ही खात्री करू. आमचे सर्व ग्राहक यापुढेही यशस्वी होतील आणि त्यांना विस्तारीत सेवा आणि उत्पादने, आघाडीचे औद्योगिक ब्रँड, विस्तारित उत्पादन क्षमता, अग्रगण्य सिंचन सेवा व्यवसायांच्या समर्थनाचा लाभ मिळत राहील, याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे. रीवूलीस कंपनीने विलीनीकरणापूर्वी चार कंपन्यांच्या संयोजनाचे प्रतिनिधित्व केले होते. या विलीनीकरणाद्वारे, जैन इरिगेशनच्या पोर्टफोलिओमधील आणखी अनेक कंपन्या जोडल्या जातील. यामुळे जगभरातील व्यवसाय एकत्र येऊन, असे जागतिक स्तरावर असे एकत्रीकरण साधण्याची आमची भूमिका अधिक मजबूत होऊन आर्थिक पाया सक्षम असलेली कंपनी निर्माण होईल. रीवूलीसच्या सर्व कर्मचाऱ्यांसह, मी जैन यू.एस.ए., ए.व्ही.आय, आय.डी.सी., आणि नानदानजैन च्या जागतिक संघांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मला खात्री आहे की आम्हा सर्वांनाच या संयुक्त संघाच्या प्रदीर्घ अनुभव, निरंतर वचनबद्धता, आणि समर्पणाचा फायदा होईल.”

-रिचर्ड क्लाफोल्झ, सीईओ, रीवूलीस

 

एकत्रीत कंपनी म्हणजे रीवूलिस आणि जैन इरिगेशनच्या दीर्घकालीन आणि उद्देशावर आधारित कंपनी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे व्हिजन प्रतिबिंबित करते. जी कृषी सिंचनाच्या परिवर्तनाचे नेतृत्व करेल. ही कंपनी सुलभता, नावीन्यता, आणि शाश्वतता यांच्या मदतीने जागतिक स्तरावरील उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांद्वारे आधुनिक सिंचन उपाययोजना आणि डिजिटल शेतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात नेतृत्व करेल.

 

या विलीनीकरणासह, कंपनी ग्राहकांद्वारे प्रेरित

कंपनीचे २५ कारखाने आणि ३,३०० कर्मचारी यांच्या मदतीने सहा खंड आणि पस्तीस देशांमध्ये अतुलनीय मार्केट कव्हरेज असेल. रिव्हुलिस, जैन, नानदान जैन आणि युरोड्रिप या ब्रँड्सवर प्रत्येक हंगामात अवलंबून असणाऱ्या उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना कंपनी पूर्णपणे समर्थन देत राहील.

 

इनोव्हेशनद्वारे प्रेरित

उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांना D5000 PC, Amnon, T-Tape, Chapin, Ro-Drip, Top, Excel, Compact, 5035 आणि Mamkad यासारख्या विश्वासार्ह उद्योग ब्रँडचा समावेश असलेल्या विस्तृत उत्पादन आणि सेवा श्रुंखलेचा फायदा होईल. आठ दशकांचे संशोधन, विकास, आणि उत्पादन अभियांत्रिकीचे शाश्वत आणि नावीन्यपूर्ण एकत्रीकरण करून जागतिक उत्पादकांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण केल्या जातील.

 

डिजिटलद्वारे प्रेरित

जैन लॉजिक, मॅन्ना, आणि रीलव्ह्यू सारख्या डिजिटल शेती सेवांमुले, ही कंपनी सर्वात व्यापक व्यावसायिक व्याप्ती असणारी एक कणखर एजी-टेक सोल्यूशन देणारी कंपनी म्हणून उदयास ऐल. विस्तृत डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्समुळे उत्पादकांना त्यांचे सिंचन कार्य प्रत्यक्ष वेळी पूर्ण करता येईल. तसेच उत्पादन वाढवून आणि कृषी निविष्ठा कमी करता येतील. यामुळे त्यांच्या उपजीविकेत सुधार होऊन जमिनींचे संरक्षण होईल.

शाश्वततेने प्रेरित

सूक्ष्म सिंचनाच्या जलसंधारण आणि मृदा संरक्षणाच्या ज्ञात फायद्यांपलीकडे, कंपनी आपला उद्देशपूर्ण ESG प्रवास सुरू ठेवेल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, कंपनी मूर्त स्वरूपातील कार्बन उत्सर्जन लक्ष्यांसाठी वचनबद्ध असेल आणि उत्पादकांना आणि व्यावसायिक भागीदारांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कार्बन साठा वाढविण्यासाठी मदत करण्यासाठी जागतिक कार्यक्रम सुरू करेल. कंपनीचे उद्दिष्ट केवळ उत्पादकांसाठी सूक्ष्म सिंचन सुलभता आणि या ग्रहाचे पोषण करणे एवढेच नसून, सर्वांसाठी अधिक शाश्वत आणि हवामान संवेदनक्षम भविष्य निर्माण करणे देखील आहे.

 

कंपनीचे सिंगापूर आणि इस्रायल, असे दोन मुख्यालये असतील आणि कंपनीचे नाव यापुढे ही रीवूलीस पीटीई लिमिटेड असेच राहील. कॉर्पोरेट ब्रँडिंगच्या उद्देशाने कंपनीला “Rivulis (In alliance with Jain International)” असे संबोधण्यात येईल. रिचर्ड क्लाफोल्झ, रिव्हुलिसचे सध्याचे सीईओ, हेच कंपनीचे नेतृत्व करत राहतील. आय.आय.बी. चे वरिष्ठ सहकारी संपूर्ण कंपनीत नेतृत्वाची भूमिका पार पाडतील, अशी अपेक्षा आहे.

 

हा व्यवहार आवश्यक नियामक मंजूरी आणि अन्य पारंपारिक बंद अटींच्या अधीन असेल आणि २०२३ च्या सुरुवातीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गोल्डमन सॅक्स यांनी आर्थिक सल्लागार, बेकर मॅककेन्झी कायदेशीर सल्लागार आणि पी.डब्ल्यू.सी. ने JITBV चे कर आणि कामातील स्थैर्याचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!