एम सी एल परिवार दशकपूर्ती निमित्ताने इगतपुरी तालुक्यात १८०७ झाडांचे वृक्षारोपण

0
50

सर्वतीर्थ टाकेद : एम सी एल परिवार दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने एम सी एल अंतर्गत श्रीबाळकृष्ण ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि आई एकविरा बायोफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड तालुका इगतपुरी परिवाराकडून इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील गावांमध्ये ७५ वा अमृतमहोत्सवी व जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी १८०७ झाडांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
भरवज निरपण याठिकाणी एम सी एल कंपनीच्या एम पी ओ रेश्मा गणेश तरे व सरपंच कैलास घारे यांच्या हस्ते प्रथमतः वृक्षारोपण करण्यात आले.

काळूस्ते गावांमध्ये झाडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर एम व्ही पी चे शिक्षक दिनकर ईदे यांच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांसह गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर गावातील मंदिरात एम सी एल कंपनीचे सी ई ओ गणेश तरे व एम पी ओ रेश्मा तरे यांनी गावातील शेतकरी ग्रामस्थांना कंपनीची सविस्तर माहिती देऊन शेतकरी बांधवांना कंपनीचे होणारे फायदे व व्हिजन मिशन बद्दल संपूर्ण माहिती या शेतकरी मेळाव्यात दिली.

या शेतकरी मेळाव्याला सरपंच वनिता घारे,चेअरमन आबाजी घारे, व्हाय चेअरमन आनंदा सारूक्ते
एम व्ही पी चे गोरक्षनाथ गव्हाणे, लक्ष्मण भोर, मधुकर गायकवाड, शांताराम चव्हाण, लक्ष्मण शेलार, संपत धोंगडे, दिनकर ईदे, सचिन झनकर, भोसले, राधकीसन पढेर आदींसह गावातील बहुसंख्य महिला ग्रामस्थ शेतकरी यावेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here