Nashik Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केल्याची घटना वडनेरभैरव गावात घडली आहे.
याप्रकरणी, महिलेच्या वडिलांनी वडनेरभैरव पोलिसांत तक्रार दिल्याने पती, सासू, सासरे आणि इतर दोन अशा पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथील रहिवासी शिवराम सजन वर्डे यांची मुलगी मोनिका (वय २४) हिचा विवाह वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील नंदू विष्णू तिडके यांचा मुलगा दशरथ तिडके याच्यासोबत झाला होता.
लग्नानंतर सासरी मोनिकास पती दशरथ, सासरा नंदू तिडके आणि सासू संगीता यांनी दुचाकी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्यास सांगितले होते. दरम्यान, महिलेने माहेरून ५० हजार रुपये आणूनही दिले होते. त्यानंतर पुन्हा शेतीसाठी २५ हजार रुपये आणण्यास सांगितले होते. पण, महिलेने माहेरून पैसे आणले नाही म्हणून सासरची मंडळी मोनिकास शारीरिक, मानसिक त्रास देऊन उपाशी ठेवत आणि मारहाणही करत होते.
Crime news | RPF जवानाकडून १७ वर्षीय तरूणीवर बलात्कार…
‘पैसे आणणार नसशील तर तुझा जगून फायदा नाही. तू मरून तरी जा’ अशा प्रकारे ते तिचा मानसिक छळ करीत होते. त्यामुळे सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने राहत्या घरी विषारी औषध घेत. आत्महत्या केली असल्याचे महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तागड ह्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तालुक्यातील तीन दिवसांत, दुसरी घटना
चांदवड तालुक्यातील शिंदे गावातील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याच्या घटनेस तीन दिवस होत नाहीत, तोच पुन्हा एकदा तालुक्यातील वडनेरभैरव येथील मोनिका तिडके या विवाहित महिलेने घरातच विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळजनक वातावरण आहे.
देवळा | पिंपळगांव वाखारी येथे मराठा आरक्षणासाठी पाठींबा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम