हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. संबंधित तरुणाची पत्नी लोकांकडे मदतीची याचना करत होती पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गुरुवारी रात्री गजबजलेल्या रस्त्यावर तरूणाची हत्या केली. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने भावाने पतीची हत्या केली आहे. या पती हिंदू आणि पत्नीचा मुस्लिम असून धर्म वेगवेगळा होता. हे जोडपं सायकल वरून जात असताना विवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी
सरूरनगरमध्ये भर रस्त्यावर हा खून केला आहे.
मृत तरूण बिल्लीपुरम नागराजू यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले आणि आजूबाजूला अनेक लोक असताना त्यांच्या देखत नागराजू यांच्यावर चाकूने हल्ला केला.
इतरांनीही रोखण्याचा प्रयत्न केला परंतु संशयितांनी त्यांनाही धमकावलं. नागाराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना हे पती-पत्नी शालेय जीवनापासून प्रेम बंधनात होते. जोडप्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा प्रस्ताव नाकारला. त्यांनी 31 जानेवारीला आर्य समाज, लाल दरवाजा इथे विवाह केला.
कुटुंबीयांचा भीतीने हे जोडपं पंजाब इथे भाड्याच्या घरात राहू लागलं. महिलेच्या कुटुंबीयांच्या धमकीच्या भीतीने ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला देखील काही काळासाठी गेले आणि नुकतेच परतले असता संशयित आरोपी सतत या दाम्पत्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर त्यांनी भररस्त्यात नागराजू यांच्यावर हल्ला केल्याचं पत्नीने सांगितले. पाच जणांनी तिच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप देखील केला आहे. नागराजूची हत्या केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी दोन जण ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम