Maratha Reservation Verdic | एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असून, काल मनोज जरांगे यांनी सरकारला एक अट घातली असून, ती मान्य केल्यास सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण घेण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे.
दरम्यान, गुणरत्न सदवर्ते यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, आज थोड्याच वेळात या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचावाद हा आता पुन्हा तिसऱ्यांदा हाय कोर्टात पोहोचला असून, या याचिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.(Maratha Reservation Verdic)
सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा विरोध..?
राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले असून, हे आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. यातच आता नेहमीच मराठा आरक्षणाला आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विरोध दर्शवणारे वकील गुणरत्न सदवर्ते यांनी मराठा समाजाला दिलेल्या १०टक्के आरक्षणाप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी डॉ. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे. तर, २७ फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीमध्ये केलेल्या बदलालाही त्यांनी आव्हान दिले आहे.(Maratha Reservation Verdic)
Maratha Reservation | एका अटिसह मनोज जरांगे १० टक्के आरक्षण घेणार..
Maratha Reservation Verdic | याचिकेत अनेक गंभीर आरोप
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या मराठा आरक्षण विरोधी या याचिकेत त्यांनी अनेक गंभीर आरोप केल असल्याचे समोर आले आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक ही चुकीची असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. एवढेच नाही तर, निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन देण्यात आल्याचे आरोप या याचिकेतून करण्यात आले आहेत. (Maratha Reservation Verdic)
Maratha Reservation | जरांगेंच्या डोक्यावर ‘या’ नेत्याचा ‘वरदहस्त’..?; महिलेचे गंभीर आरोप
पुन्हा मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार?
तर, याप्रकरणी मराठा आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल झाली असून, यावेळी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, आता उच्च नयायलय या प्रकरणी काय निकाल देणार? हा निकाल सदवर्ते यांच्या बाजूने असेल की, राज्य सरकारच्या बाजूने आणि जर पुन्हा उच्च न्यायालयाने हा निकाल राज्य सरकारच्या विरोधात दिला. तर, पुन्हा मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहणार का? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता हायकोर्टात होणाऱ्या सूनवणीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. (Maratha Reservation Verdic)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम