CM Eknath Shinde | राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे राज्यभरातील मराठा आंदोलकांकडून संताप व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज मराठा समाज शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. काल सायंकाळी मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झाले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे आज मराठा आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी पुण्यातून आलेल्या सात सदस्य मंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
Maratha Reservation | जरांगेंच्या उपोषणावरून नाशिकमधून मराठा आंदोलकांचं राज्य सरकारला अल्टिमेटम
बैठकीत कोणत्या मुद्द्यांना केले अधोरेखित?
या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवणे व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यासोबतच मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थांच्या गॅझेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांना दिले.
Maratha vs OBC | वडीगोद्रीत ओबीसी-मराठा आंदोलक समोरा-समोर; पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात
काय म्हणाले शंभूराजे देसाई
“आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले की उद्या कॅबिनेट बैठक झाली की तुम्ही दोघांनी म्हणजे शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी मिळून यामध्ये प्रत्येक दिवसाचा फॉलोअप घ्या. तसेच कुठलीही दफ्तर दिरंगाई होऊ देऊ नका. माझ्या वतीने तुम्ही त्या आंदोलनकर्त्यांना विनंती करा की तुम्ही उपोषण स्थगित करावं. त्यामुळे मनोज जरांगे निश्चित उपोषण स्थगित करतील असे मला वाटते.” अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम