Maratha Reservation | कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी अवगत असलेला माणूस द्या अन्यथा येत्या बुधवारपासून सरकारी कामकाज होऊच देणार नाही, असा इशारा माळशिरस येथील सकल मराठा समाजातील आंदोलकांनी दिलेला आहे. माळशिरस ह्या तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम हे ठप्प झाल्याने मराठा आंदोलक प्रचंड संतप्त झालेले असून, त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनदेखील केले.
राज्यभरात सध्या मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम हे वेगाने सुरु असताना माळशिरस ह्या तालुक्यात केवळ मोडी लिपी वाचणारा व्यक्ती शासनाने नेमलेला नसल्याने ह्या नोंदी शोधणे आता अवघड झाल्याने, यामुळे संतप्त आंदोलकांनी या विरोधात आज माळशिरस येथील तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केलं.(Maratha Reservation)
यावेळी प्रशासनाने तातडीने मोडी लिपी वाचणाऱ्या एका व्यक्तीची नेमणूक करावी. नाहीतर, सरकारी कामकाजच चालू देणार नसल्याचा इशाराही यावेळी मराठा आरक्षण कृती समिती समनव्यक धनाजी साखळकर यांनी दिलाआहे.
Agriculture News | साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव
१५०० नोंदी पडून
सध्या सोलापूर येथील माळशिरस ह्या तालुक्यात मोडी लिपीत अनेक दस्तऐवज आहेत. पण, वाचणारा माणूसच तहसील अथवा प्रांत कार्यालयात नसल्याने केवळ १५०० च नोंदी सापडल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने मोडी लिपीतील कागदपत्रे तपासणे हे अत्यंत गरजेचे आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदत संपायला केवळ १४ दिवस उरलेले असतानाच माळशिरस तालुक्यात एकही मोडी लिपीतील कागदपत्रांची तपासणी झालेली नाही. प्रशासनाने आंदोलकांनीच मोडी लिपी वाचणारा अभ्यासक आणावा, असं सांगितल्याने संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी माळशिरस तहसील कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन केलं. मोडी लिपी वाचणाऱ्या व्यक्तीची तातडीने व्यवस्था न केल्यास कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. (Maratha Reservation)
मराठा समाजाचे सर्वेक्षण होणार
मराठा समाजाचे सर्व्हेक्षण या वादावरुन राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे सर्व्हेक्षण हे लवकरच केले जाणार आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्याबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल, असेही यावेळी आयोगाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाची शुक्रवारी पुणे येथे बैठक झाली. दरम्यान, आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे तसेच अन्य सात सदस्य हे यावेळी उपस्थित होते. आयोगाचे एक सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी, बाकी सर्वच जातींचे मागासलेपण तपासावे अशी मागणी लावून धरत आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष निरगुडे यांनी राज्य सरकारलाच माहिती दिली जाईल. योग्य वाटल्यास त्याबद्दल पत्रकारांना माहिती दिली जाईल असे सांगत त्यांनी माहिती देण्यास यावेळी नकार दिला.(Maratha Reservation)
Crime | धक्कादायक! आइसक्रीम घेण्यासाठी गेलेल्या ८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला पिशवीत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम