Maratha Rally : नाशिक | मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांची मागणी मान्य करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येत आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची शांतता जनजागृती रॅली ही अहमदनगरमध्ये असून, उद्या ही रॅली नाशिकमध्ये दाखल होणार आहे.
उद्या मंगळवारी (दि.१३) रोजी सकाळी तपाेवनातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि आज अहमदनगर तर उद्या नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता जनजागृती रॅली महाराष्ट्र दौऱ्याची शेवटची रॅली होणार आहे. तर, यानंतर 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहे. (Maratha Rally)
दरम्यान, इतर शहरांमधील गर्दी पाहता या यात्रेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती लाभत असून, उद्या नाशिकमध्येही हजारोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकितीत काही बदल करण्यात आले आहेत. सकाळी आठ वाजेपासून रॅलीसह काही महत्त्वाच्या मार्गांवर प्रवेश बंदी करण्यात येणार असून, त्याबाबत शहर वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. (Maratha Rally)
Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित; भाजप, आमदारांविरोधात ठोकला शड्डू!
Maratha Rally | ‘या’ मार्गांवर प्रवेश बंद
- स्वामी नारायण चौक ते कन्नमवार पुल – सर्व वाहनांना प्रवेश बंद
- मिर्ची हॉटेल सिग्नलपासून ते स्वामीनारायण चाैक
- संतोष टी पॉईंट – दिंडोरी नाका – मालेगाव स्टँड
- रविवार कारंजा – सांगली बँक सिग्नल – मेहेर सिग्नल ते सीबीएस (दोन्ही बाजूच्या मार्गांवरील प्रवेश बंद)
पर्यायी मार्ग
- छ. संभाजी नगरहून मिर्ची सिग्नल-अमृतधाम-तारवाला नगर सिग्नल-मार्केट यार्ड-पेठ राेड मार्गे
- धुळ्याकडून येताना अमृतधाम कडून तारवाला नगर सिग्नल- मार्केट यार्डकडून पेठराेड मार्गे-शहरात
- दिंडोरी नाक्याकडून येताना पेठ नाका-मखमलाबाद नाका-रामवाडी पुल
- दिंडोरी नाक्याकडून बाहेर जाणाऱ्यांसाठी तारवाला चौक-हिरावाडी मार्गे
- द्वारका सर्कलकडून-कन्नमवार ब्रीजकडे पुलाखालून न जाता वाहतूक व्दारका उड्डाण पुलावरून जाईल
Manoj Jarange | ‘६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात…’; जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
वाहनांसाठी पार्किंग
- संभाजीनगर रोडमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी – निलगिरी बाग
- पेठ रोड-दिंडोरी रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी – पेठ राेडयेथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड
- घोटी इगतपुरी, मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी – महामार्ग बसस्थानकाच्या शेजारील मोकळी जागा
- त्र्यंबकरोडहून येणाऱ्या वाहनांसाठी – गोल्फ क्लब मैदान
- गंगापूर गावाकडून येणाऱ्या वाहनांसाठी – डोंगरे वसतिगृह मैदान व मराठा विद्याप्रसारक कॉलेज
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम