Manoj Jarange Patil | आज मनोज जरांगे यांच्या शांतता जनजागृती रॅलीचा नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला २९ तारखेला अंतरवालीला येण्याचे आवाहन केले असून, २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आपली पुढील भूमिका ही समाजासमोर स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी शड्डु ठोकल्यानंतर भुजबळांनी त्यांना आव्हान दिले होते. याला आज नाशकातूनच जरांगेंनी उत्तर दिले आहे.
लोकसभेला यांची जिरवली ना…
ते माझ्या विरोधात नाही बोलत. देवेंद्र फडणवीसला पण मीच औषध दिलय. त्या भुजबळला पण दिलं होतं. पण ते आता पुन्हा दोन दिवसांपासून बोलायला लागलं. आता ते प्रवीण दरेकर पण बोलायला लागलंय. माझ्या विरोधात सगळे विधान परिषदेचेच आमदार बोलता. विधानसभेचे असे मैदानातले बोलतच नाही. ते म्हणता नको याच्या नादी लागलं की ही डायरेक्ट पाडतंच. तुम्ही त्यांना लोकसभेला असा कचका दाखवला ना. त्यांची अशी जिरवली ना. त्यामुळे आता विधानसभेचे आमदार नकोच म्हणता. (Manoj Jarange Patil)
मी फक्त पाडा म्हणलं आणि तुम्ही बरोबर पाडलं. जे कधी पडणार नाही वाटलं होतं. ते पण यंदा पडले. तुमच ते एक तर धाकाने उभंच नाही राहीलं. अन् उगच मिडियासमोर म्हणतं मला वरून देत होते आणि खालून देत होते. तुला कोण देत होतं रे..? मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं.
Manoj Jarange Patil | तुम्ही नको तिथे विहीर खणता…
आपण यांच्याकडून स्वतंत्र १० टक्के आरक्षण मागितलं होतं का..? ते यांनी बळच दिलं आणि आता म्हणता की जरांगे आणि मराठ्यांच्या आंदोलनामुळे ews आरक्षण गेलं. तुम्ही नको तिथे विहीर खणता आणि म्हणता पाणी का लागत नाही. खडकावर खणल्यावर तुमच्या बापाला पाणी लागलं होतं का. (Manoj Jarange Patil)
भुजबळ सारख्या पैदाशी…
२९ तारखेला अंतरवालीला या. पडायचं की निवडून आणायच हे ठरवू. पण निर्णय कोणता पण करा पूर्ण ताकदीने काम करायचं. आपण मराठ्यांची शान ठेवायची. आपले प्रश्न हे आपलेच गरिबांचे पोरं सोडवू शकतात आणि यात जर या भुजबळ सारख्या पैदाशी मध्ये आडव्या येत असतील तर त्यांना पण या निवडणुकीत पाडून टाका.
Shantata Rally | जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात; समता परिषदेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
फडणवीस साहेब तुम्हाला भांडण लावायची लय सवय आहे
फडणवीस साहेब माझ्या नादाला लागू नका. नाहीतर मुळासकट तुमच्या भाजपचे उमेदवार उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचंय. पण तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्हाला उतरावंच लागेल. तुम्ही जातीजातीत भांडणं लाऊ नका. तुम्हाला भांडण लावायची लय सवय आहे. यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. यांनी कितीही डाव टाकले तरी त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही. नेते विरोधात गेले म्हणजे समाज विरोधात असं होत नाही. आपली एकजूट फुटू देऊ नका, अशी भावनिक साद शेवटी जरांगे पाटलांनी समाजाला घातली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम