Manoj jarange | मराठा आरक्षणावरून दोन्ही बाजूचे समर्थक हे आमने सामने आलेले आहेत. दरम्यान, वाशिममध्ये मनोज जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले आहेत. तर, लातूरमध्ये भाजपचे बावनकुळे यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj jarange)समर्थकांनी आंदोलन केलं आहे.
तर, दुसरीकडे मागासवर्ग आयोगामध्ये शासनाच्या दबावाच्या आरोपातून राजीनामा सत्र हे देखील आता सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांची वाशिम येथील काटे ह्या गावात सभा होती. त्यावेळी भुजबळांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवत जरांगेंच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत. दरम्यान, त्याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजणक विधान केलेलं असून, आता त्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
भुजबळ जास्तीच नाटकं करायला लागलाय
जरांगे पाटील (Manoj jarange) यांना काळे झेंडे दाखविण्यात आलेत. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ हे जास्तीचे आहेत. सध्या तो जासतीच नाटकं करायला लागलाय. छगन भुजबळ तुझ्या कार्यकर्त्याना आमच्या विरोधात आंदोलन करायला लावणार असशील. पण, आम्ही पण सध्या शांत आहोत हे लक्षात ठेव. तू जरा, सबुरीने घे भुजबळ. मला हे असलं दाखवून काय होत नाय. मी काय मंत्री नाहीये. तू शहाणपणाची भूमिका घे, असा हल्लाबोल यावेलि मनोज जरांगे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही पलटवार केला असून, ‘तू काय राज्याचा नेता नाही झालाय सगळ्यांना ऑर्डर द्यायला. इथे ओबीसी सत्तावीस टक्के आहेत. त्याच्यामध्ये भटके आणि विमुक्तही आहेत. सत्तावीस टक्क्यातला काही भाग जो आहे. तो त्यांना दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये दुसरा माळी, तेली, कुणबी हा जाऊच शकत नाही. तुम्ही सगळं खाताय रे, अभ्यास कर रे बाबा. काय आणि ते कसं त्याची मांडणी आहे. ती बघ, प्रश्न तर विचारा ना तुम्ही आम्ही उत्तर देऊच ना त्याचं असंही यावेळी भुजबळ म्हटलेत.
Big News | आता दर शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी? अर्थ मंत्रालयाची माहिती
मागासवर्ग आयोगाततील काही सदस्यांनी काही मंत्र्यांवर आरोप केलेत. तर, काहींनी यामुळे राजीनामेही दिले आहेत. त्यात आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निर्गुडे हे सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे. ह्या आयोगाच्या कामकाजात शासनाचा वाढता हस्तक्षेप हे त्यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हटले रोहित पवार..?
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी जे सध्या सामाजिक क्षेत्रात सामान्य लोकांसाठी लढत आहेत. ते कदाचित ह्या जानेवारी महिन्यात राजकारणामध्ये येतील, असं विधान खळबळजनक विधान त्यानी केलं आहे. ते म्हणाले की, “मला असं वाटतंय की, आजची राज्याची स्थिती बघता काही “लोकं जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत.
ते कदाचित ह्या जानेवारीत राजकारणात येतील की काय,असंही आम्हाला वाटतंय. पण, तेव्हा काय होईल हे त्यावेळीच आपल्याला बघावं लागणार आहे”. असेही ते म्हणाले. त्यांच्या ह्या विधानाचा रोख हा थेट मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)यांच्याकडे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्या या विधानाची आता चर्चा ही राज्यात सुरु झाली आहे.
Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम