नाशिक: 26 जानेवारी 2023 स्वतंत्र भारताचा 74 वा. गणतंत्र दिवस. या दिवशी शासन आपल्या दारी कार्यक्रम अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील वरखेड्याचे मंडळ अधिकारी प्रिती अग्रवाल यांच्या कार्यालय मार्फत सामान्य नागरिकांसाठी QR code ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
बऱ्याच वेळा शेतकरी खातेदार यांचे अर्ज तहसिल कार्यालय मार्फत चौकशी कामी मंडळ अधिकारी कार्यालय येथे येतात. चौकशी कामी आलेल्या प्रकरणासाठी खातेदारांना विविध कार्यालयांना चकरा माराव्या लागतात यात खातेदारांचा वेळ आणि प्रवासात पैसे दोन्ही खर्च होतात. हे सर्व थांबवून खातेदारांना शासन आपल्या दारी याची खरी अनुभूती यावी म्हणून 26 जानेवारी 2023 पासून वरखेडा मंडळ अधिकारी कार्यालय ने QR code चा नवीनतम उपक्रम सुरू केला आहे यामध्ये चकरा न मारता घरच्या घरी आपल्या फोन न वरून स्कॅन करून आपल्या अहवालाची सद्यस्थिती, स्थळ प्रत पाहता येणार आहे. या उपक्रमाचे मंडळातील सर्व नागरिकांनी कौतुक केले असून याने नक्कीच सर्वांना फायदा होऊन दिलासा मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम