गांधी परिवाराच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला कॉंग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

0
2

दिल्ली : येथील कॉंग्रेस मुख्यालयात नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट येथे भेट देऊन महात्मा गांधी, शांतीवन येथे जवाहरलाल नेहरु आणि शक्तीस्थळ येथे जाऊन इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यांनतर झालेल्या कार्यक्रमात कॉंग्रस पक्ष निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी खर्गे यांना निवडणूक प्रमाणपत्र देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सोनिया गांधी यांनीही खर्गे यांचे अभिनंदन केले.

काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलाला काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच नवा भारत घडवण्यासाठी त्यांना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. कारण त्यांना माहित आहे की जोपर्यंत काँग्रेस आहे, तोपर्यंत ते करु शकत नाहीत. पण आम्ही ते होऊ देणार नाही, त्याविरोधात लढा देत राहू असेही खर्गे यावेळी म्हणाले.

सोनिया गांधींनी केले खर्गेंचे अभिनंदन

यावेळी सोनिया गांधी यांनी नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करत म्हणाल्या, परिवर्तन हा जगाचा नियम आहे. याआधीही काँग्रेसला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण मला खात्री आहे की, आम्ही अडचणींवर मात करु, असा विश्वास यावेळी सोनिया गांधींनी केला. तसेच ते एक अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्कीच होईल. कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षपदाचा प्रवास त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्ण केला असल्यचे म्हणत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

२४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष

८० वर्षीय मल्लिकार्जून खर्गे यांच्या रूपाने तब्बल २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती कॉंग्रेस अध्यक्षपदी बनली आहे. १७ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या १३७ वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यात त्यांनी शशी थरूर यांचा मोठा पराभव केला होता. आता त्यांच्यासमोर पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आणि पक्ष व विरोधकांना एकजूट करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here