Malegaon MGV college : मालेगाव शहर तसे जिल्ह्याच्या दर्जाचे आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवत मालेगाव आणि सटाणा येथे तर जिल्हा बँकेच्या थकबाकीप्रकरणी मालेगाव येथे अद्वय हिरेंसह रेणुका देवी संस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून कर्मचाऱ्यांची पुन्हा पिळवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे. मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदीर व आदिवासी सेवा समिती, नाशिक या शैक्षणीक संस्थांच्या शेकडो ने बालवाडी ते पदवी पर्यंत शाखा असून हजारोच्या संख्येने कर्मचारी वर्ग आहे. मात्र या कर्मचारी वर्गाचा गैरफायदा घेतला जात असल्याची कुजबुज कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
या संस्थेतील कर्मचाऱ्यांना संस्थेचे ट्रस्टमार्फत सक्तीने ट्रस्टी कुटूबांच्या अधिपत्याखालील असलेल्या व्यंकटेश सहकारी बँक, मालेगाव, नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक, कर्मवीर भाऊसाहेब हिरे वेतनदार सह. पतसंस्था संस्थामध्ये १०-२० हजारांपासुन ते लाख रुपयांपर्यंत ठेवी ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र असे झाल्यास भविष्यात कर्मचाऱ्यांची देखील कायदेशीर अडचण होण्याची शक्यता असून काही गैरव्यवहार झाल्यास कर्मचारी देखील कायदेशीर बाबीत गुंतले जातील अशी भीती कर्मचारी वर्गामध्ये आहे.
कर्मचाऱ्यांना काय आहे भीती ?
- सदर ठेवींचा पैसा पुढील टप्यात काही कर्मचाऱ्यांच्या नावांवर कर्ज म्हणुन काढणेत येईल.
- तो पैसा कर्मचारी स्वतः कॅश काढुन संस्था चालकांना देतील.
- संस्थाचालक हा पैसा यापुर्वी नोकरी लावणेसाठी काही उमेदवारांकडुन घेतलेला पैसा परत करणेसाठी वापरतील.
- कर्मचाऱ्यांच्या नावावरील कर्जाची परत फेड पगारातुन न होता विद्यार्थीची फी, शैक्षणिक अनुदान शासकीय योजनांतून आलेला निधी, संस्थेच्या नावावर काही प्रकल्प दाखवून बँकामधुन कर्ज काढुन व इतर माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या नावावरील कर्ज फेड केली जाईल…
- यापुर्वी वारंवार असे प्रकार झालेले आहेत. सबब कर्मचाऱ्यांमध्ये या बाबत भीती असुन पुढील काळात चौकशी झाल्यास आपल्यावरही कारवाई होईल अशी त्यांना भिती आहे. मात्र नोकरी जाण्याच्या भीतीने कुणी कर्मचारी तक्रार करण्यास तयार नाही. मात्र त्यांच्या मनाची घालमेल कुणी पुढे येवून मांडेल का आणि ही संस्था कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- गेल्या काही दिवसांपूर्वी राखीव शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अद्वय हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर स्थावर मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३१ कोटी ४० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सोसायटीच्या संचालक मंडळाविरूद्ध रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम