Malegaon | मालेगाव विकास कामांसाठी पहिल्याच दिवशी ९३ कोटींचा निधी

0
23
Malegaon
Malegaon

Malegaon |  हिवाळी पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नाशिकच्या मालेगाव (Malegaon) बाह्य मतदार संघातील रस्ते आणि पूल बांधण्यासाठी ९३ कोटी रुपये इतक्या ह्या भरघोस निधीला पहिल्याच दिवशी मान्यता मिळालेली आहे. मालेगावच्या बाह्य मतदार संघाच्या विकासासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मालेगाव  मतदार संघाचे आमदार दादाजी भुसे हे नेहमीच प्रयत्नशील राहिलेत.

winter session | फडणवीसांसमोर अजित दादांची माघार; मलिकांवरून जुंपली

दरम्यान, ह्या निधीमधून आता मालेगाव (Malegaon) मधील रस्त्यांचा कायापालट होणार असून, राज्य सरकारने येथील रस्त्यांच्या विविध विकास कामांसाठी ९३ कोटी रुपयांचा निधी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर केलेला आहे.

सदर निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (DCM Devendra Fadanvis) तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी विशेष प्राधान्य देत मंजूर केलेला असून, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले  आहे.

कृषी विज्ञान संकुलाची इमारत बांधकाम

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मालेगाव (Malegaon) बाह्य मतदार संघातील काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील इमारतीच्या बांधकामासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून तयासाठी सातत्याने पाठपुरावाही दादा भुसे यांनी केला होता.

काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे साकारण्यात येत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, मालेगाव येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती.

Satana News | सटाणा नगरपालिका ही राज्यात अव्वल!

कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ही प्रत्येकी ६० असून, अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षांचा आहे. तसेच कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थ्यांची असून अभ्यासक्रमाचा कालावधी हा तब्बल ४ वर्षांचा आहे.(Malegaon)

या कृषी संकुलामुळे जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी ह्या उपलब्ध झालेल्या आहेत. कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान देणे, कृषीवर आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे हे यामुळे शक्य झाले आहे.

winter session | फडणवीसांसमोर अजित दादांची माघार; मलिकांवरून जुंपली

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी ह्या महायुती सरकारचे आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारने कार्यभार सांभाळल्या नंतर राज्यातील रस्ते विकासाला विशेष प्राधान्य दिलेले आहे. मालेगावच्या बाह्य मतदार संघातील रस्ते विकासाच्या कामांसाठी निधी मंजूर करून आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो.

– दादाजी भुसे ( पालकमंत्री, नाशिक)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here