शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी लवकरच लॉन्च करणार CNG tractor

0
23

CNG tractor | शेतीत आता काळाच्या ओघात अनेक बदल होऊ लागलेले आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी नवीन आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत थोडासा सोपा आणि फायदेशीर झालेला आहे.

Election Result | चार राज्यांत आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?

आता ट्रॅक्टरमुळे शेतीच्या पूर्व मशागती पासून ते पिकाच्या काढणीपर्यंत सर्वच कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ लागलेली आहेत. यामुळे शेतकरी बांधव आता शेती कामांसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करू लागलेले असताना वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर शेतकरी बांधव वापरत आहेत. अशातच आता देशातील एका प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनीने CNG वर चालणारे नवीन ट्रॅक्टर तयार केले आहे. खरे तर सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडे (Mahindra CNG tractor) असणारे बहुतांशी ट्रॅक्टर हे डिझेलवर चालत आहेत मात्र आता सीएनजी गॅसवर चालणारे ट्रॅक्टर देखील तयार झाले आहे.

 

महिंद्रा या देशातील प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनीने हे ट्रॅक्टर बनवलेले आहे. या CNG वर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे जलद होणार आहेत याशिवाय इंधन खर्चात मोठे बचत होणार आहे असा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे.

Big News | गुणमोजणीचा फॉर्म्युला बदलला! दहावी-बारावीत आता टक्केवारी अन् श्रेणी नाही

कसा आहे महिंद्रा कंपनीचा CNG tractor?

 

महिंद्रा कंपनीने नुकताच आपला नवीन CNG tractor प्रदर्शित केला आहे. या ट्रॅक्टरची विशेषता म्हणजे हा ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच ताकदवान काम करणार आहे. या ट्रॅक्टरमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी 45 लिटरच्या चार टाक्या देण्यात आल्या आहेत. या ट्रॅक्टरच्या चार टाक्यांमध्ये जवळपास 24 किलो एवढा गॅस भरला जाऊ शकतो. कंपनीच्या मते CNG tractor ला इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत प्रति तास शंभर रुपये कमी इंधन खर्च लागणार आहे.

 

या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या पैशात मोठी बचत होण्याची शक्यता आहे. हा ट्रॅक्टर प्रदूषणदेखील कमी करणार आहे. एकंदरीत हा नवीन CNG tractor शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान कंपनीकडून हा ट्रॅक्टर बाजारात आणण्यासाठी सर्व आवश्यक तयारी सुरू झालेली आहे. यामुळे लवकरच हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. (Mahindra CNG tractor)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here