Mahayuti Sarkar : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहे. परंतु असे असूनही महायुतीत असणारे अंतर कलह वारंवार निदर्शनास येत असतात. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त केली गेली. त्यानंतर सावंतांच्या या वक्तव्याची पाठराखण करणारे वक्तव्य शिंदे गटाच्या दुसऱ्या नेत्याकडून करण्यात आले आहे. तेव्हा या सर्वांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Political News | महायुतीला मोठा धक्का; बडे नेते ‘ तुतारी ‘ फुंकणार..?
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिंदे गटाच्या नेत्याचे अजित पवार गटाबरोबर जुळून घेण्यास त्रास होत असल्याच्या वक्तव्याने महायुतीला दणाणून सोडलं. यातूनच महायुतीत सारं काही अलबेल नाही हे आता वारंवार दिसून येत आहे. महायुतीत अजित पवार सामील झाल्यामुळे शिंदे गटाकडून नाराजीचा सूर दिसतोय. परंतु आता या सर्वांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याची माहिती पुढे येत आहे.
Mahayuti Sarkar | नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेण्यास त्यांना कशाप्रकारे त्रास होत आहे हे एका सभेमध्ये उघड उघड बोलून दाखवले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आणि पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला देखील दिला. याच प्रकरणावर आता शिंदे गटाचे दुसरे नेते संजय शिरसाट यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण करत “सावंतांनी केलेले वक्तव्य हे जुन्या युतीबाबत होते.” असे म्हणत या प्रकरणी सारवासारव केली. सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली व अजित पवार गटाच्या नेत्यांनी बाहेर पडून जाण्याची भूमिका घेतली. यावरून संजय शिरसटांकडून ही सरावासारव करण्यात आली. “तानाजी सावंत यांचे ते वक्तव्य जुन्या संदर्भाने आहे. आम्ही सुद्धा काँग्रेस आणि एनसीपी सोबत होतो, तेव्हा आम्हालाही त्रास व्हायचा. पण यावेळी आम्ही महायुती सोबत आहोत आणि चांगले काम करतोय. असं वक्तव्य संजय शिरसाटांनी सदर प्रकरणी केलं. “आम्ही एखादं दुसरं वाक्य बोललो की त्याचा मोठा इशू केला जातो, तेव्हा आमच्या लोकांनी संयम सोडू नये. अशी वक्तव्य येत जात असतात. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे आणि ते लवकरच त्यांच्याशी या संदर्भात बोलून घेतील. आपणा सर्वांनाच सांभाळून बोलण्याची गरज आहे. असे मत संजय शिरसाटांनी व्यक्त केले.
नेमक प्रकरण काय होतं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये “राष्ट्रवादीसोबत जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो, तरी बाहेर आलं की उलट्या होतात.” या शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाविरूद्ध बोलून तोंडसुख घेतले होते. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून त्यांच्या या वक्तव्यांचा चांगलाच परिचय घेतला गेला. “तानाजी सावंतांचे ऐकून घेण्यापेक्षा युतीतून बाहेर निघालेले बरे. आपल्याला सत्तेची गरज नाही. ज्या भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले. त्याच भाजपाने अजित पवार यांना देखील सत्तेत घेतले तेव्हा हा देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपने घेतलेला निर्णय आहे. तानाजी सावंतांना आमच्या वर बोलण्याचा अधिकार नाही.” असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आणि अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला देखील दिला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम