Nashik Crime | धक्कादायक! नाशकात पित्याकडूनच गतिमंद मुलीवर अत्याचार

0
78
Rape Case
Rape Case

Nashik Crime : राज्यभरात स्त्रियांवरील अत्याचार वाढल्याचे चित्र आहे. त्यामध्येही अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या जास्त आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नाशिकच्या पळसे गावात एक धक्कादायक प्रकारा उघडकिस आला आहे.

Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना

पळसेगाव परिसरात राहणाऱ्या एका गतिमंद मुलीवर जन्मदात्या-पित्याकडूनच मारहाण व अत्याचार झाल्याची संताप जनक घटना नाशिक रोड येथे घडली आहे. सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईने नाशिक रोड पोलीस ठाण्यात पित्तविरुद्ध तक्रार दाखल केली असून बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News | ‘धोखा देने वालों की एक ही सज़ा है ‘मौत’ म्हणत माथेफिरुने प्रेयसीला संपवलं; ७८ दिवसांत लागला निकाल

Nashik Crime | घटना कधी घडली?

नाशिक येथील पळसे गाव परिसरात बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादित म्हटले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन व गतिमंद असून पित्याने घरात नेत मारहाण केली. तसेच तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार लक्षात येतात पिडीतेच्या आईने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

त्यानंतर आरोपीवर फॉक्सोसह बलात्काराच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या घटनेने नातलगांकडूनच चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीचे चित्र समोर आले आहे. या आधी देखील जिल्ह्यामध्ये पित्याकडून चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. (Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here