Mahavikas Aaghadi | मविआतील नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

0
59
#image_title

Mahavikas Aaghadi | विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जागा वाटपावरून बैठकांवर बैठका पार पडत आहेत. तर सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटप आणि मंत्रीपदावरून तिढा असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. दरम्यान, नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी नाना पाटोलेंचे नाव आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आता काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे.

Mahavikas Aaghadi | शरद पवारांनी राऊतांना सुनावले खडेबोल; जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये धुसफूस

काय म्हणाले संजय राऊत? 

काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पाटोले यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या मागणीबाबत प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी, “काँग्रेस पक्षामध्ये अशी काही भूमिका असेल तर या संदर्भात त्यांचे जे हाय कमांड राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे असतील हे त्यावर निर्णय घेतील. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही ततर किंवा राष्ट्रवादीला दिले तर हिसकावून घेऊ असअसं आम्ही म्हणत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत असतील तर ते नाना पटोले यांच्या प्रतिमेचे नुकसान करणारा ठरेल. असे मला वाटते.” या शब्दात टोला लगावला.

Mahayuti Sarkar | शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; निधी मिळत नसल्याने उचलले पाऊल

“…हे नाना पटोलेंसाठी अडचणीचे ठरू शकते”

तसेच, आघाडीमध्ये कोणी काहीही बोलले तरी उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा, आघाडीचा चेहरा निश्चितपणे ठरवला गेला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाचा चेहरा देणार असाल तर आम्ही त्यांच स्वागत करू, समर्थन करू. ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे ज्या नेत्या संदर्भात अशा प्रकारची वक्तव्य केली जातात त्यांच्यासाठी हे अडचणीचे ठरू शकते. नाना पटोले हे काँग्रेसचे अत्यंत निस्वार्थी व संयमी नेते आहेत. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करत असतात त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचे काम करू नये.” असा सल्ला देखील संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसमधील पटोलेंच्या समर्थकांना दिला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here