Mahavikas Aaghadi | शरद पवारांनी राऊतांना सुनावले खडेबोल; जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये धुसफूस

0
41
#image_title

Mahavikas Aaghadi | लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यामध्ये चांगल्या जाग मिळवत महाविकास आघाडीने आता विधानसभा गाजवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, आघाडीतील घटक पक्षांनी देखील आता कंबर कसली आहे. तसेच विधानसभेसाठी मोर्चेबांधणी आणि जागावाटपाबाबात सध्या मविआतींल नेत्यांच्या बैठकांचे सत्र संपण्याचे नाव घेत नाहिये. याचे कारण म्हणजे काही मुद्यांवरून मविआतील नेत्यांमध्ये मतभेद होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आता नगरमधील श्रीगोंदा मतदारसंघाच्या उमेदवारी वरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात तिढा निर्माण झाला असून, परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे शरद पवारांनी संजय राऊतांना सुनावले आहे.

Assembly Election | ‘महायुतीत 70 टक्के…’; जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे मोठे विधान

नेमके प्रकरण काय? 

संजय राऊतांनी नगरमधील श्रीगोंदा मतदारसंघावर दावा ढोकत, येथून पुढचा आमदार ठाकरे गटाचा असेल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया देत, ” काल शिवसेनेचे एक नेते तुमच्या तालुक्यात येऊन, येथे त्यांचे उमेदवार आहेत असे जाहीर केले. परंतु अशाप्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणालाही नाही.” असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या राऊतांना सुनावले.

Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

राऊतांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न

शरद पवारांनी उघडपणे राऊतांची कानउघडणी केली असता, संजय राऊतांनी शरदपवारांकडे श्रीगोंद्या बाबत चुकीची माहिती आहे. काम करण्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना संदेश देत असतो. असे म्हणत नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here