Government Employees Strike | राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी हे 29 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, यावर वेळीच तोडगा न निघाल्यास सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प पडणार असून, यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबणार आहेत.
येत्या 29 ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली असून, राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आल्याची माहिती आहे. तर, राज्य सरकारने याबाबत तातडीने आदेश जारी करण्याची मागणी करण्यात आली असून, जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरु राहणार असल्याची ठाम भूमिका कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे. (Maharashtra Government Employees Strike)
Doctors Strike | सरकारकडून आश्वासनांचे गाजर; निवासी डॉक्टर संपावर
Government Employees Strike | नेमकं प्रकरण काय ?
महाराष्ट्रातील 17 लाख सरकारी, निम सरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. राज्य सरकारने पेन्शनबाबत केवळ आश्वासन दिले असून, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही किंवा तसा आदेशही जारी करण्यात आलेला नाही. सामाजिक तथा आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, त्या संदर्भात नोटीफिकेशन निघालेलं नाही. त्यामुळे सर्व सरकारी, निम सरकारी कर्मचारी व शिक्षक हे चिंतेत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील, याची साशंकता निर्माण झाल्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता संपली असून, त्यांनी 29 ऑगस्टपासून राज्यभरात बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली आहे.(Maharashtra Government Employees Announce Strike)
Gram Panchayat Strike | ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प?; सरकारची डोकेदुखी वाढणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम