नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहत असून, आता युती आणि आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. यातच आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मविआकडे 12 जागांची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) माकप नेते माजी आमदार जे.पी. गावीत हे दिंडोरी लोकसभेतून इच्छुक होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, जयंत पाटलांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला. दरम्यान, आता माकपने विधानसभेसाठी रणशिंग फुंकत 12 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहरातील पक्ष सभासदांची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पक्षाचे राज्य सेक्रेटरी उदय नारकर, माजी आमदार जीवा पांडू गावित, भिका राठोड, डॉ. डी. एल. कराड हे उपस्थित होते. या सभेत विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका कॉ. उदय नारकर यांनी मांडली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत कॉ.जे.पी गावित यांनी सांगितले.
Nashik Shivsena | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार जाहीर; मविआत वादाची ठिणगी..?
माकप महाविकास आघाडीसोबत 12 जागा लढवणार
लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीतही माकप महाविकास आघाडीतच काम करणार असल्याची ग्वाही देत यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत माकप पदाधिकार्यांची बैठकही झाल्याचे यावेळी डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.
तसेच या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीसोबत माकप राज्यातील 12 जागा लढवणार असून, याचा प्रस्ताव माकपकडून मविआच्या बैठकीत मांडण्यात आला आहे आणि यास शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनीही मान्यता दिल्याचे माकप प्रदेश सेक्रेटरी कॉ. उदय नारकर यांनी जाहीर केले.
Vidhan Sabha Election | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ 3 जागा माकप लढवणार..?
तर, माकप इच्छुक असलेल्या या 12 जागांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण आणि नाशिक पश्चिम या जागांचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघावर या आधीच शिवसेना ठाकरे गटाने दावा करत आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभेला जशी दिंडोरी लोकसभा मतदार संघावरून माकप आणि शरद पवार गटात चढाओढ पाहायला मिळाली.
तशी विधानसभेला ठाकरे गट आणि माकपमध्ये पहायला मिळणार का..?ठाकरे गटाने नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या दोन जागांवर दावा केला असून, नाशिक पश्चिमची माकपने तर, नाशिक मध्यच्या जागेची मागणी ही कॉंग्रेसने केली आहे. त्यामुळे आता या जागा कोणाला मिळणार..? हे पहावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम