Nashik News | मागील महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रीलंकेतून आणलेल्या व बुद्ध स्मारकात रोपण केलेल्या बोधीवृक्षाची फांदी ही आता टवटवीत झाली असून, महापालिका व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या रोपट्याची काळजी घेतली जात आहे.
दर महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी नऊ ते बारादरम्यान या वृक्षाचे उपासकांना दर्शन घेता येणार आहे. या महिन्यात २७ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा योग येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भन्ते सुगत यांनी दिली. बुद्ध धर्मात अत्यंत मनाचे स्थान असणाऱ्या बोधीवृक्षाच्या रोपणामुळे शहराच्या टोपात आणखी एक मनाचा तूर जोडला गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रोपणानंतर अकराव्या दिवशीच या फांदीला आता पालवी आली आहे.
उद्यान विभागाचे श्री. परब व श्री. भदाने दररोज या ठिकाणी येऊन रोपट्याची पाहणी करतात. सध्या हा चबुतरा आणि आसपासची जागा ही कुलूपबंद ठेवण्यात आली आहे.
नाशिक हादरलं! निफाडच्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या; कारण समोर येताच पोलीस हादरले
दिवसाआड अगदी आवश्यक तितके खतपाणी या रोपाला देण्यात येत आहे. उद्यान विभागाचे कर्मचारी अधिकारी आणि बुद्धवंदना करणाऱ्या भन्तेजी व्यतिरिक्त या ठिकाणी कुणालाही सध्या प्रवेश देण्यात येत नाही.
नाशिक शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारक परिसरात भगवान गौतम बुद्धांना ज्या महाबोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे विजयादशमीच्या दिवशी रोपण करण्यात आले होते. या महाबोधी वृक्षाला यात नवीन पालवी फुटली आहे. दरम्यान, आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याठिकाणी पाहणी केली.
यावेळी आनंद सोनवने, भत्ने संघरत्न, भन्ते धम्मरक्षित, समाधान जेजूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बोधीवृक्षाची पाहणी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सामूहिक बोधीवृक्ष वंदना घेण्यात आली.
Crime News | एक कोटींची लाच स्वीकारताना अधिकारी जाळ्यात…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम