प्रेम, संशय अन् प्रियसीचा धारधार शस्त्राने खून ; वाचा काय घडलं आपल्या शहरात

0
41

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : पाच वर्ष प्रेम संबंधात असून दोघे तरुण-तरुणी एकमेकांसोबत लग्न करणार होते. मात्र, तरुणीस तरुणाची वागणं संशयास्पद दिसू लागल्याने तरुणीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला. मात्र, नकार पचवण्याची ताकद मुलामध्ये नव्हती म्हणून त्याने रागाच्या भरात तरुणीच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करुन तिची हत्या केली आणि तो तिथून पसार झाला. या प्रकरणामुळे औंध परिसरात एकच खळबळ माजली आहे. श्वेता रानवडे (वय २२ रा. औंध) असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

या प्रकरणात प्रतीक ढमाले त्याचे वडील किसान ढमाले आणि प्रतीकचा मित्र रोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेता रानवडे होची आई दिपाली रानवडे यांनी चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता रानवडे आणि प्रतीक ढमाले यांच्यामध्ये ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबियांकडून त्यांच्या लग्नास मान्यता देखील मिळाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून त्यांच्या प्रेमाचं रूपांतर संशयात झाले होते आणि प्रतीक हा श्वेतावर संशय घेऊन त्रास देऊ लागला होता. शुल्लक कारणावरून तो संशय घ्यायचा. प्रतीक याची अचानक बदललेली वर्तणूक पाहून श्वेताने होणाऱ्या लग्नास नकार दिला. याप्रकरणी प्रतीकचे वडील आणि प्रतिकचा मित्र तिला सतत धमकी देऊन तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र, श्वेता ही तिने घेतलेल्या निर्णयावर ठाम होती. मात्र, हा निर्णय प्रतिकला पटला नसल्याने त्याने श्वेताची निर्घृणपणे हत्या केली.

श्वेता ही बुधवारी आपल्या आई सोबत बाजारात गेली होती. घरी परत येत असताना पार्किंगमध्ये प्रतीक तिची वाट पाहत होता. प्रतीकने तिला पार्किंगमध्ये गाठत तिच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करून तो तिथून पसार झाला. श्वेता गंभीर जखमी झाली असल्याने तिला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून मुलींमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here