love Crime: प्रेयसीला भेटायला जाताय तर सावधान ?, मिरची पावडर डोळ्यात टाकून प्रियकराची हत्या

0
23

love Crime: प्रेमात आंधळे असणाऱ्या युवकांना यातून चांगलाच धडा मिळणार आहे. प्रेमा तुजा रंग कसा म्हणणाऱ्या तरुणाईला हा तिखट रंग बघायला मिळणार आहे. नुकतेच लातूर जिल्ह्यात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी तरुणाला कसे तुडवले हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून, लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. एक महिलाही तरुणाशी भांडत आहे. मारहाण इतकी झाली कि आता तो तरुण या जगात नाही. मारहाणीनंतर १५ दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.(love Crime)

या प्रकरणाची माहिती देताना लातूरचे पोलीस अधीक्षक म्हणाले की,  हे प्रकरण भादा गावाशी संबंधित आहे. प्रेमप्रकरणातून 15 दिवसांपूर्वी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीमुळे तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. तरूणाला मारहाण करणाऱ्यांवर खुनाचे कलम लावण्यात आल्याचे एसपींनी सांगितले. यासोबतच सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. (love Crime)

लातूरचे एसपी म्हणाले की, आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोकांनी तरुणाला जबरदस्तीने मारहाण केली आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. दुसरीकडे, गावकऱ्यांनी सांगितले की, मृत तरुणाचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. (love Crime)

त्रंबकेश्वर : वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना पर्यटकांसमोर नाचवले जातेय….!

पोलिसांनी सात आरोपींना अटक केली 

तो मुलीला भेटण्यासाठी गावात आला होता, मात्र मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. त्यांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील सात जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. (love Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here