Loksabha 2024 | लोकसभेचा बिगुल वाजला; संभाव्य तारखा जाहीर..!

0
40
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Loksabha 2024 |  संपूर्ण देश ज्या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत होता. त्या बहुप्रतीक्षित २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर झेलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट कंबर कसून तयारी करत आहेत. दोन्ही गटात जागावाटपाचे सूत्र ठरल्याचे वरवर दाखवले जात असले तरी, जागा वाटपावरून खडाजंगी सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) ‘लोकसभा २०२४’ च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ एप्रिल २०२४ ही संभाव्य तारीख जाहीर केली आहे. दरम्यान, यामुळे आता सर्वच पक्षांत निवांडणुकांची लगबग सुरू झाली आहे. (Loksabha 2024)

स्वतः मोदी मैदानात… 

१२ जानेवारी रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये येऊन या निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ फोडले. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असून, केंद्रीय मंत्र्यांचे आता महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. जानेवारी महिन्यातच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिक, सोलापूर हे दोन दौरे झाले असून, लवकरच ते पाटणादेवी येथेही येणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यातच मोदींचे तीन महाराष्ट्र दौरे होणार आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांच्याच केंद्र स्थानी महाराष्ट्र असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. तसेच, भाजपकडून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक लोकसभेचे उमेदवार असल्याचेही सांगितले जात आहे.

PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?

Loksabha 2024 | आता ठाकरे गटाचेही ठरले

तर, काल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नाशिकमधून प्रचाराचे नारळ फोडले. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पंचवटीतील काळाराम मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले आणि गोदा आरती केली. तर, दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी भाजपला खुले आव्हानही दिले.

Nashik Loksabha | मराठ्यांना नडल्याचे परिणाम; अजित दादांनीच भुजबळांना दूर लोटले

पुन्हा राजकीय ‘भाकरी’ फिरणार ?

दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघडीत बिघाडी होत असल्याचे दिसत असतानाच, आता निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्षांची लगबग तसेच रस्सीखेचही वाढणार आहे. नुकतंच मंत्री गिरीश महाजन यांनी राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आता काय घडामोडी होतात. पुन्हा राजकीय ‘भाकरी’ फिरणार ? की ‘हेराफेरी’ होणार? हे पहावे लागणार आहे.(Loksabha 2024)

कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या पक्षांतरानंतरही गिरीश महाजनांनी येणाऱ्या काही दिवसांत कॉंग्रेसचे आणखी काही नेते हे महायुतीत प्रवेश करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता. यामुळे आता वेगाने घडामोडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यासह देशाच्या राजकारणाच्या या पटलावर कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय होतो, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.(Loksabha 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here