Lok Sabha Election Voting | आज राज्यात चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत असून, राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती सांभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड ११ मतदारसंघात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, यातील बीड, पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगर या ठिकाणांवरील लढतींकडे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election Voting)
दरम्यान, मागील तिन्ही टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीप्रमाणेच आजही महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे. दुपारी १ वाजेपर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ३१.०६ टक्के इतके मतदान झाले आहे. यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सर्वात कमी २६.४८ टक्के इतकेच मतदान झाले आहे. (Lok Sabha Election Voting)
Lok Sabha Election phase 3 | राज्यातील ‘या’ ११ हायव्होल्टेज जागांवर आज मतदान
Lok Sabha Election Voting | कुठे किती टक्के मतदान
- जळगाव – ३१.७०%
- जालना – ३४.४२%
- नंदुरबार – ३७.३३%
- शिरूर – २६.६२%
- अहमदनगर – २९.४५%
- संभाजीनगर – ३२.३७%
- बीड – ३३.६५%
- मावळ – २७.१४%
- पुणे – २६.४८%
- रावेर – ३२.०२%
- शिर्डी – ३०.४९%(Lok Sabha Election Voting)
Lok Sabha Election | हे कसले संकेत..!; मतदान सूरू असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी
महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान
दुपारी १ वाजेपर्यंत देशात ४०.३२ % मतदान झाले आहे. तर. यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले असून, पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. (Lok Sabha Election Voting)
- आंध्र प्रदेश – ४०.२६ %
- बिहार – ३४.४४ %
- झारखंड – ४३.८० %
- मध्य प्रदेश – ४८.५२ %
- महाराष्ट्र – ३०.८५ %
- ओडिसा – ३९.३० %
- तेलंगणा – ४०.३८ %
- उत्तर प्रदेश- ३९.६८ %
- पश्चिम बंगाल – ५१.८७ %
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम