Lok Sabha Election | हे कसले संकेत..!; मतदान सूरू असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

0
72
Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Election |  आज देशासह राज्यात तिसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष ज्या मतदार संघाकडे लागलेले आहे. अशा बारामती लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला आहे.

एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक सुप्रिया सुळे ह्या अजित पवार यांच्या मुळगावी काटेवाडी येथील घरी दाखल झाल्या आहेत. बारामतीत ननंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजाय सुनेत्रा पवार या एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत आणि आज बारामतीत तिसऱ्या टप्प्याचे  मतदान सुरू आहे. असे असताना सुप्रिया सुळे ह्या अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या असून, त्या अजित पवारांच्या आईच्या भेटीला आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावेळी अजित पवार हेदेखील घरी उपस्थित असून, या भेटीमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election phase 3 | राज्यातील ‘या’ ११ हायव्होल्टेज जागांवर आज मतदान

Lok Sabha Election | मतदारांवर आणि मतदानावर परिणाम 

आज मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधीक असून, या भेटीचा परिणाम नक्कीच येथील मतदारांवर आणि मतदानावर होईल, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असताना दोन्ही नेते जर कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर याचा मतदार किंवा कार्यकर्त्यांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. (Lok Sabha Election)

Lok Sabha Election | पाच वर्ष कुठे होतात..?; भाजप आमदाराला गावकऱ्यांनी झापले

मतदान करून सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी 

बारामती येथे मतदान करून सुप्रिया सुळे या अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी आल्या. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी आल्या. त्यावेळी तिथे अजित पवार आणि व त्यांच्या आई आशाताई पवार हे दोघे होते. दरम्यान, या भेटीमुळे चर्चांना उधाण आले असून, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, यावेळी सुप्रिया सुळे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले असून, “मी आशा काकींना भेटायला आणि त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती.” असे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे ज्यावेळी अजित पवारांच्या घरी गेल्या. त्यावेळे तिथे अजित पवार आणि त्यांच्या काकी आशाताई पवार होत्या. मात्र, सुनेत्रा पवार नव्हत्या अशी माहिती समोर आली आहे. तर, सुप्रिया सुळे यांची ही अचानक भेट आजच्या मतदानावर आणि राजकारणावर कसा परिणाम करेल हे बघावे लागणार आहे. (Lok Sabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here