Lok Sabha Election Result | देशाचा कौल कोणाकडे; दिल्लीच्या तखतावर कोण बसणार..?

0
31
Lok Sabha Election Result 
Lok Sabha Election Result 

Lok Sabha Election Result |  लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या लोकसभा निकालाकडे पूर्ण देशाचं लक्ष वेधलेले आहे. निकालाच्या पूर्वी एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या एक्झिट पोल्समध्ये एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं.

मात्र, मतमोजणीनुसार इंडिया आघाडीचे २१८ उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सत्ता कोणाची असणार एनडीए की इंडिया आघाडी याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

एनडीएला ३०२ जागानी आघाडीवर तर ‘इंडिया’ची २०९ जागांवर आघाडी, चौथ्या फेरीनंतर मोदी आघाडीवर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू असून वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथ्या फेरीनंतर पुन्हा एकदा आघाडीवर आले आहेत. तर काँग्रेसचे अजय राय पिछाडीवर गेले असल्याचे दिसून येत आहे.Lok Sabha Election Result

Dindori Lok Sabha Result | भारती पवारांना मोठा धक्का; मोठ्या फरकाने भगरेंची आघाडी

गुजरातचा कौल कोणाकडे?

भाजप २५ जागांनी आघाडीवर. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू असून गुजरातचा कौल नेमका कोणाकडे ? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. आपल्याला मिळालेल्या माहिती प्रमाणे गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी २५ जागांनी आघाडीवर तर इंडिया आघाडी १ जागेने आघाडीवर आहे.Lok Sabha Election Result

मध्य प्रदेशचा कौल कोणाला?

२७ जागांनी भाजप आघाडीवर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मध्य प्रदेशमध्ये कौल कोणाला? याकडे जनतेचे लक्ष वेधलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी २७ जागांनी आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी ही २ जागांनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Nashik Lok Sabha Result | राजाभाऊ वाजेंची विक्रमी आघाडी; गोडसेंची हॅट्रिक धोक्यात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here