Lok Sabha Election Phase 2 | देशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान; राज्यातील गावांचा मतदानावर बहिष्कार

0
24
Igatpuri
Igatpuri

Lok Sabha Election Phase 2 | आज देशभरात दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 88 तर महाराष्ट्रात 8 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. यात राज्यातील विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे. यात संपूर्ण देशाचे लक्ष ज्या मतदार संघाकडे आहे. ते म्हणजे राहुल गांधी ज्या मतदार संघातून उभे आहेत. तो केरळमधील वायनाड मतदारसंघ.(Lok Sabha Election Phase 2)

आज राहुल गांधींचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यांच्याविरोधात वायनाडमध्ये भाजपचे के. सुरेंद्रन व सीपीआयच्या अॅनी राजा हे उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे मथुरेत हेमामालिनी, कोटा बुंदी या राजस्थानामधून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनांदगावमधून भुपेश बघेल, तिरूअनंतपुरममध्ये शशी थरूर, दक्षिण बंगळुरूमध्ये भाजपचे तेजस्वी सूर्या, मेरठचे भाजपचे उमेदवार अरूण गोविल या दिग्गजांचेही भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. (Lok Sabha Election Phase 2)

Lok Sabha Election Phase 1 | ‘या’ मतदार संघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान

Lok Sabha Election Phase 2 | महाराष्ट्रातील गावांचा मतदानावर बहिष्कार 

देशाला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष काळ लोटली. मात्र, आम्हाला अजूनही मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. आजवर आम्ही निवडून दिलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्या गावांना मूलभूत सोयीसुविधादेखील पुरवल्या नाहीत, असे आरोप करत या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, अमरावती लोकसभा मतदारसंघातील गबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, खोपमार या सहा गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तर, यापूर्वी शिरूर लोकसभा मतदार संघातीलही काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. (Lok Sabha Election Phase 2)

Lok Sabha Election | आमदारकीचे तिकीट हवे असेल तर लीड द्या; भाजपची नवी ऑफर..?

समस्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत मतदान नाही 

आज लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू असून, देशभरातील एकूण 88 जागांवर ही मतदान प्रक्रिया सुरू आहे.  आजच्या या मतदानाच्या रणसंग्रामात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, एकीकडे या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाट या आदिवासी भागातील तब्बल सहा गावातील गावकऱ्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.(Lok Sabha Election Phase 2)

गेल्या 77 वर्षांपासून आमची गावं ही मुलभुत सुविधांपासूनही वंचित आहेत. आम्ही निवडून दिलेले एकाही प्रतिनिधींनी आमच्या समस्यांच्या निराकरण केले नाही. पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, पक्के रस्ते, आरोग्य केंद्र, यापैकी एकही मूलभूत सुविधा आम्हाला मिळाली नसून, आम्ही लोकप्रतिनिधींकडे आम्ही मागणी करूनही आम्हाला सुविधा मिळालेल्या नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या समस्यांवर तोडगा निघत नाही. तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या सहा गावांतील संतप्त गावकऱ्यांनी घेतला आहे.  (Lok Sabha Election Phase 2)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here