Lok Sabha 2024 | काय सांगता..! या लोकसभेतही मोदींचीच लाट..?

0
57
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 | लोकसभा निवणुका या अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असून, यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. असं म्हणतात की, दिल्लीचे युद्ध ज्या पक्षाला जिंकायचे असेल त्या पक्षाला आधी उत्तर प्रदेशचे युद्ध जिंकावे लागते. दरम्यान, इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’च्या सर्वेमधून उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे.

देशातील लोकसभा निवडणूक ही आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर, या निवडणुकांसाठी देशातील वातावरण हे कुठल्या पक्षासाठी पोषक आहे. याचे सर्वेक्षण इंडिया टुडे-सी व्होटरतर्फे करण्यात आले आहे. देशातील तब्बल ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन १,४९,०९२ लोकांचे सर्वे करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे संपूर्ण सर्वेक्षण १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान करण्यात आले होते.(Lok Sabha 2024)

Lok Sabha 2024 | जनतेचा कौल कोणाला..?

२०१९ च्या देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशमधूनच सर्वाधिक जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता यावेळी उत्तर प्रदेशची जनता आता पुन्हा भाजपला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. दरम्यान, ‘मूड ऑफ द नेशन’च्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशच्या लोकांचा कौल हा याहीवेळी भाजपच्याच दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपच आघाडीवर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.Nashik | असा आहे देवेंद्र फडणवीस यांचा ‘नशिक दौरा’

अशी असणार मतांची टक्केवारी

इंडिया टुडे-सी व्होटरच्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वे नुसार, उत्तर प्रदेशमधील तब्बल ८० लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला ५२.१ टक्के इतके मतं मिळू शकतात. तर, दुसरीकडे काँग्रेसला ५.५ टक्के इतकी तर समाजवादी पक्षाला ३०.१ टक्के, बसपा ८.४ टक्के व इतर पक्षांना ३.९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.(Lok Sabha 2024)

कुणाच्या हाती किती जागा..?

या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील जागांबद्दल बोलायचं तर, ‘मूड ऑफ द नेशन’ च्या सर्वे नुसार भाजपला तब्बल ७० जागा मिळू शकतात. तर, एनडीए दलाचा भाग असलेल्या अपना दलाला २ जागा आणि समाजवादी पार्टीला ७ जागा तर, काँग्रेसला १ आणि बसपाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे.Manoj Jarange | असा आहे मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा कसमादे दौरा

भाजपची टक्केवारी वाढणार..?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ५० टक्के मतं मिळाली होती. समाजवादी पार्टीला १८.११ टक्के तर, काँग्रेसला ६.३६ टक्के इतकी मतं त्यावेळी मिळाली होती. तसेच यावेळी तब्बल ६२ जागा या भाजपने मिळवल्या होत्या. समाजवादी पार्टीने ५ , बसपाने ५, अपना दल पार्टीने २ आणि काँग्रेसने १ इतक्या जागा मिळवल्या होत्या. दरम्यान, या सर्वेनुसार आता याहीवेळी भाजपचीच लाट असून, या निवडणुकांमध्ये भाजपची मतांची टक्केवारीही वाढण्याची शक्यता आहे.(Lok Sabha 2024)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here