Lok Sabha 2024 | काय सांगता..! आता खासदार अमोल कोल्हेही…

0
12
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता राजकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केल्या जात असून, नुकतंच आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज त्यांनी त्यांच्या आमदारकीचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा असून, या दिवशीच केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थित ते भाजप प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.(Lok Sabha 2024)

Lok Sabha 2024 | अमोल कोल्हे अजित पवार गटात 

दरम्यान, यातच आता आणखी एक नाव हे चर्चेत असून, यावर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे आता अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. अजित दादा गटातील एका मोठ्या मंत्र्याने याबाबत सांगितल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाने शिरूर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केलेली असली, तरी ते आगामी काळात कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी सांगितले आहे.(Lok Sabha 2024)

Breaking News | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभी फूट..?, १० आमदारही नॉट रीचेबल

या जागांवर अजित दादा गटाचा दावा 

यावेळी मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, “शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची शिरूरमधील उमेदवारी जाहीर केली असली तरीही ते येत्या काही दिवसांत कधीपण अजित पवार गटात येऊ शकतात. त्यामुळे जिथे विद्यमान चार खासदार हे आमच्या पक्षाचे आहेत. अशा चार जागा आम्हीच लढणार आहोत. तसेच यासह भंडारा, गोंदिया व गडचिरोली या विदर्भातील आणखी ३ अशा एकूण ९ जागांवर अजित पवार गट निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Lok Sabha 2024)

Ashok Chavhan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर..?

शरद पवारांनी आराम करावा… 

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की,”शरद पवार यांनी आता आराम करावा आणि मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावं, असा खोचक सल्लाही धर्माबाबा अत्राम यांनी यावेळी पवारांना दिला आहे. राज्यात शरद पवारांपेक्षा अजित पवारांचा चेहरा हा मोठा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान, आता अजित दादांच्या या नेत्यांनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरणार? अमोल कोल्हे हे सध्या शरद पवार गटाचा निष्ठावंत चेहरा आहेत. त्यामुळे ते खरंच अजित दादांसोबत जाणार का? आणि येणाऱ्या काळात आणखी काही राजकीय घडामोडी होतात का? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Lok Sabha 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here