Ashok Chavhan | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. यात विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे दिसत आहे. एकामागोमाग एक मोठे काँग्रेस नेते हे पक्षाची साथ सोडून इतर पर्याय शोधत असून, मागील महिन्यात सर्व प्रथम मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का मिळाला होता. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची ५० वर्षांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.(Ashok Chavhan)
त्यानंतर मुंबईतूनच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का मिळाला. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिदद्की यांनीही त्यांच्या मुलासह काँग्रेसची ४५ वर्षांची साथ सोडत राष्ट्रवादीची वाट धरली. दरम्यान, यातच आता पुन्हा एक अनपेक्षित आणि मोठा धक्का काँग्रेसला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ ठोकत भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, आजच अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Congress | ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी लवकर जावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठी राजकीय खेळी खेळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या अधिक माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आजच आपल्या आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.
यासोबतच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून, या दोघांमध्ये बंद दाराआड काही चर्चाही झाली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील हा अद्याप उघडकीस आलेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.(Ashok Chavhan)
Breaking News | काँग्रेसची गळती सुरूच; ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा
Ashok Chavhan | काय म्हणाले अशोक चव्हाण..?
काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो होतो, असे अशोक चव्हाणांनी सांगितले आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या तोंडावर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे मत कही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असेच, भाजपकडून चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारीही दिली जाऊ शकते.(Ashok Chavhan)
नांदेडमध्ये अशोक चव्हाण ह एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. तसेच त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवलेले असल्याने, या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आता हे तर्कवितर्क खरे ठरणार आणि अशोक चव्हाण हे खरंच आज भाजपमध्ये प्रवेश करणार का..? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Ashok Chavhan)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम