Breaking | नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राची धार्मिक राजधानी ओळखला जातो. तसेच नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. दरम्यान, नाशिक शहरात वाढत्या विकासाबरोबरच शहरातील गुन्हेगारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच आता गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालणारा उच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे.
Shirdi | शिर्डीत ‘नो मास्क, नो एंट्री’; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत लॉजिंग व्यावसायिकांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला असून MMRDA ने दिलेल्या कारवाईच्या नोटीसीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे आता नाशिक शहरातील अतिक्रमित लॉजिंग ही जमिनदोस्त करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
तसेच सध्या शहराच्या अनेक भागात लॉजिंग आणि कॅफेच्या आड अनैतिक कामे चालवली जातात. यातच उच्च न्यायालयाने दिलेल्या या स्थगितीमुळे त्र्यंबकरोडवरील लॉजिंगच्या आडून चालणारे अनैतिक कामे बंद होतील तसेच अवैध कामं करणाऱ्यांना यामुळे चाप बसेल.
Nashik Corona | नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोनाचे तीन शिकार
मात्र, MMRDA ने दिलेल्या कारवाईच्या नोटीसीला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलेला असल्याने गैर कृत्य करणाऱ्या व्यवसायिकांबरेबरच वैध काम करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फटका बसू शकतो. मात्र या निर्णयामुळे नाशिककरांमध्ये समाधानाचं वातावरण पहायला मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम