‘मेड इन चायना’ पणतीचा स्थानिक कारागिरांना फटका

0
18

द पॉईंट नाऊ: आपल्या संस्कृतीत दिवाळीच्या सणात पणतीला विशेष महत्त्व असते. त्यामुळेच सण जसा जवळ येत आहे, तशी मातीपासून पणती घडवणाऱ्या स्थानिक कारागिरांची लगबग वाढली आहे. मात्र, काही वर्षांपासून बाजारात दाखल झालेली आकर्षक, वजनाने हलकी, फुटण्याची भीती नसलेल्या चायना पणतीला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने स्थानिकांना त्याचा फटका बसत आहे.

दिवाळीचा सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सजावटीच्या वस्तू लाइट माळा, आकाशकंदील, रंगबेरंगी पणत्यांनी वाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली. आहे. आपल्या चिमुकल्या प्रकाशाने संपूर्ण अंगण आणि परिसर उजळून टाकणाऱ्या पणतीला विशेष असे महत्त्व असते. म्हणूनच या सणाला दीपोत्सव म्हणूनदेखील संबोधले जाते.

आपल्या प्रकाशाने अंधार दूर करून सर्वत्र चैतन्य पसरवणाऱ्या पणत्या या काळात घरोघरी प्रज्वलित केल्या जातात मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या या पणत्यांना प्रकारानुसार प्रतिडझन चाळीस ते पन्नास रुपयांपासून दर मिळतो. पणत्यांना मिळणारी ही मागणी लक्षात घेता शहर परिसरातील पणती उत्पादकांकडून चार महिने अगोदरच पणत्यांच्या उत्पादनाला सुरुवात होते. तयार झालेल्या पणत्या वाळल्यानंतर रंगरंगोटी करून बाजारात आणल्या जातात. सण तोंडावर आल्याने सध्या पणत्यांना रंग देण्याची लगबग सुरू आहे. पाच पणती, डबल प्लेट पणती, कोलकाता पणती, कासव, मासा पणती, चायना मेड पणती अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र, दूरवरून चकाकणाऱ्या आकर्षक, वजनाने हलक्या, तेल गळती आणि फुटण्याची भीती नसलेल्या चायना पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे स्थानिक कारागिराला त्याचा फटका बसत आहे.

यांत्रिकीकरणाचा वापर

पारंपरिक पद्धतीप्रमाणेच पणत्या तयार करण्यासाठी आता यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. माती मळणे, चिखल तयार करणे, चाक फिरवणे, पणतीला आकार देण्यासाठी आता मशिनरीचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मातीच्या पणत्या आता अधिक आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहेत.

चायना पणत्यांना मागणी मिळत असली तरी अनेक ग्राहक जाणीवपूर्वक मातीच्या पणत्या खरेदी करतात. दिवाळीत
प्लास्टिकच्या चायना पणत्यांना नव्हे, तर रंगबेरंगी मातीच्या पणत्यांनाच महत्त्व असते. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. स्थानिक कारागिरांना बळ देण्यासाठी मातीच्या पणत्या खरेदी कराव्या.

– स्थानिक पणती कारागीर.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here