Nashik news | नाशिकची जीवनवाहिनी पुन्हा बंद..!

0
35

Nashik news | काल मंगळवार (दि. २१) पहाटे चार वाजेपासूनच नाशिक शहरची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक बससेवा ही पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे.

दरम्यान, सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला आहे. अचानक बस बंद झाल्याने प्रवासी, व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.

आज पहाटेपासून तपोवन मधील बस डेपोतून एकही बस ही नाशिकच्या रस्त्यावर धावलेली नाही. नाशिक महानगरपालिकेच्या २०० पेक्षा जास्त सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे.

Gold Silver Rate | सोने-चांदीसाठी मोजावे लागणार आता इतके रुपये..?

ही बससेवा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतचे हे सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांचे सहावे आंदोलन आहे.

ह्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांची मागील दोन वर्षापासून कुठलीही पगार वाढ झालेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगारही थकलेला आहे. तसेच दोन वर्षाचा बोनसही मिळालेला नसल्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेले आहे.

Breaking news | अंकुश शिंदेंची तडकाफडकी बदली; संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here