Nashik News |  नाशिकच्या अंबड भागात पुन्हा बिबटयांचा वावर

0
50

Nashik News |  नाशिकमधील अंबड येथील श्रीराम नगर, फडोळ मळा ह्या भागात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान परिसरातील काही नागरिकांना बिबट्या रस्त्याने जाताना दिसला. त्यानंतर तो पुढे मळे परिसरातून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दरम्यान, रात्री बिबट्या दिसल्याची बातमी पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याच रस्त्याने रात्रीच्या वेळी अनेक कामगार हे ये-जा करत असतात. त्यामुळे कुणावरही हल्ला होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Nashik  News |  त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

याबाबत नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती कळविली असून, आता ह्या परिसरात नागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वीच सावता नगर तसेच गोविंद नगर ह्या भागात बिबट्याला पकडण्यात वान विभागाला तसेच स्थानिक पोलिसांना यश आले होते. तसेच, कालदेखील शहरातील पाथर्डी परिसरात बिबट्या पकडण्यात आला होता. त्यामुळे अंबड भागातही बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Crime news | चांदवडच्या तरुणाला दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ निर्घुणपणे संपवलं


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here