Leopard attack : नाशिक रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी, आनंद नगर परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यामुळे नाशिक रोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरल आहे.
नाशिकला बिबट्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं निर्माण होत आहे. नाशिक जिल्हा सह शहरातील विविध ठिकाणी दिवसागणिक बिबट्या आढळून येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यातच नाशिकमधील वर्दळीच्या असणाऱ्या नाशिक रोड भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. नाशिक रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी परिसरामध्ये रविवारी रात्रीच्या वेळी हा बिबट्या मुक्त संचार करताना दिसून आला तर या बिबट्याने परिसरातून पायी जाणाऱ्या एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला देखील केला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल आहे.
https://thepointnow.in/acp-murdered-wife-and-nephew-and-committed-suicide/
गेल्या काही दिवसांपासून नाशिक रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी आनंदनगर यांचं विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं असून वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेत या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे. तर नागरिकांनी देखील रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, एकट्याने घराबाहेर पडू नये, घराबाहेर जात असताना टॉर्च, काठी घेऊन बाहेर पडावे तसेच बिबट्या निदर्शनास आल्यास तातडीने वनविभागाला कळवावे अस आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
याआधी देखील नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी बिबट्याने हल्ला करत अनेकांचा बळी घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याचा संचार मोठ्या प्रमाणात असल्याचं वेळोवेळी अधोरेखित झाल आहे.
मागील महिन्यातच त्र्यंबकेश्वर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन लहान बालके गंभीरित्या जखमी झाली होती. यानंतर देखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने वनविभागाने या वाढत्या घटनांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना कराव्या अशी मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम