Lasalgaon | पाणीप्रश्नी लासलगाव बंद; तर, मतदानावरही टाकणार बहिष्कार

0
25
Lasalgaon
Lasalgaon

Lasalgaon |  सध्या राज्यासह जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, याच पाणी प्रश्नावरून नाशिकमधील लासलगाव येथे बंद पुकारण्यात आला आहे. लासलगावमध्ये (Lasalgaon) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, येथे भीषण पाणीटंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. याकामी प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने संतप्त लासलगावच्या नागरिकांनी बंदची हाक दिली आहे. यासाठी येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, लासलगावमध्ये आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत.

दरम्यान, गेल्या २० दिवसांपासून शहरात पाणीपुरवठाच झाला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीतदेखील कुठलाही तोडगा निघाला नसल्याने संतप्त नागरिकांनी आज बंद पुकारला आहे. या बंदला व्यापऱ्यांनीही प्रतिसाद दिलं असून, आज शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, येथील नागरिकांनी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरही (Lok Sabha Election Voting) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला  आहे.(Lasalgaon)

Breaking news | मराठवाडा-नाशिक पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

Lasalgaon | लोकसभा मतदानावर बहिष्कार

दरम्यान, लासलगाव (Lasalgaon) ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम आणि शाखा अभियंता पी. एस. पाटील यांच्या उपस्थित गुरुवारी बैठक झाली. यात पाणी पुरवठा योजना एमजीपीने चालवण्यास घ्यावी आणि आतापर्यंत या योजनेसाठी झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी हमी द्यावी आणि पाणीपुरवठा योजनेचे सोलर पॅनल तातडीने सुरू करावे, असे मुद्दे मांडले होते.

मात्र, या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसून, नागरिकांनी शनिवारी लासलगाव बंद पुकारला. तसेच आता जोपर्यंत हा प्रश्नी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष घालत नाही तोपर्यंत लासलगावकर (Lasalgaon) लोकसभा मतदानावर बहिष्काराच्या निर्णयावर ठाम राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

चांदवड | केंद्रीय पथकानं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर केली पाहणी; कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

नाशिक जिल्ह्यात पाणी परिस्थिती काय..?

सद्यस्थितीला नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून, पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण पणीसाठी हा केवळ २०.८४ टक्के इतका आहे.(Lasalgaon)

  1. गंगापूर धरण समूह –  28.05%
  2. कश्यपी धरण –  23.87%
  3. गौतमी गोदावरी धरण – 18.4%
  4. पालखेड धरण – 11.64%
  5. करंजवण धरण – 14.99%
  6. वाघाड धरण – 3.95%
  7. ओझरखेड धरण – 0%
  8. पुणे गाव धरण – 0%
  9. तिसगाव धरण – 0.22%

जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ही झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यातील 296 गावांसाठी एकूण 1053 ठिकाणी 326 टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरु आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here