नाशिकमध्ये लालपरी पुन्हा सुरू, 93 टक्के कर्मचारी कामावर रुजू

0
13

शासन विलीनीकरणासाठी एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनात उच्च न्यायालयाने आदेश केल्याने संपकरी कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दि.२१ एप्रिल सायंकाळपर्यंत नाशिक विभागातील ९३ टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले. लाल परी पुन्हा एकदा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद दिसत आहे.

तब्बल सहा महिने सुरू असलेल्या एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने संपकाळात करण्यात आलेली कारवाई एसटी प्रशासनाने मागे घेतली. तर त्यानंतर संपकरी कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर परत येण्यास सुरुवात झाली. संपकरी कर्मचार्‍यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. नाशिक येथे त्यामुळे एसटी प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ४८७ कर्मचारी अद्यापही संपात कायम असून, त्यांना कामावर परतण्यासाठी शुक्रवारी दि.२२ एप्रिल अखेरची संधी मिळणार असल्याने विभागीय कार्यालयात कर्मचा-यांनी हजेरी लावली आहे.

मालेगाव आगारातील ४१७ पैकी २९८ कर्मचारी सेवेवर दाखल झाले आहेत. लालपरीने पाचशे टप्पा पार केला असून, एसटीच्या दैनंदिन फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे.ग्रामीण भागासह इतर सर्व ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही पूर्वपदावर येऊ लागल्याने खाजगी वाहतूकीसाठी लागणारा आर्थिक खर्च वाचणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गांचे प्रश्न सुटणार आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटन स्थळ व गावाकडे कसे जायचा असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. आता ते सोईस्कर होईल असे वाटते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here