Crime news | नाशिक जिल्ह्यात भेसळ युक्त पदार्थांच्या विक्रीचे सत्र हे सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दूध, पेढे, मिठाई अशा अनेक पदार्थांच्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. दरम्यान, आता मालेगाव येथील एका मसाले उत्पादकाच्या कारखान्यावर छापा टाकत लाखो रुपये किंमतीचा मसाला आणि मिरची जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कारवाई करण्याबाबतची मोहीम अन्न व औषध प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्हयाभरात राबविली जात आहे.
नाशिक शहरात ऐन दिवाळीत जमावबंदी आदेश लागु; किती दिवस जमावबंदी लागु?
या मोहिमेदरम्यान, मालेगाव येथील सीमा मसाले प्रॉडक्ट प्रा.लि. या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी छापा टाकला व मसाल्याची तपासणी केली असता मिर्ची आणि मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे खाद्य रंग वापरण्यास बंदी असूनही ह्या उत्पादकाकडे खाद्य रंगाचा साठा अधिकाऱ्यांना आढळून आला.
यावेळी पथकाने १ लाख, ६१ हजार, ४०० रुपये इतक्या किंमतीचा मिर्ची आणि मसाला जप्त केला आहे.
चोरीला गेलेला ट्रॅक्टर आरोपींसह ताब्यात; देवळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम