Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केल. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानंतर योजनेला राज्यभरातील महिलांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे व अजूनही मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले असून उशिरा अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांकडून विचारण्यात येत आहे. यावरच प्रतिक्रिया देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर महिलांनी योजने करिता अर्ज भरण्यास सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या काळात महिलांना अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतर सरकारने यात बदल करीत ही प्रक्रिया आणखीन सोपी व सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न केला व असंख्य महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज दाखल केले. या सर्व महिलांचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये रक्षाबंधनच्या मुहूर्तावर खात्यात जमा करण्यात आले. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींनीच मुख्यमंत्र्यांचं भाषण थांबवलं; नेमकं काय घडलं?
‘या’ तारखेला जमा होणार योजनेचे पैसे
नागपूर येथे लाडकी बहिणी योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा येत्या 31 ऑगस्टला होणार असून या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून 31 ऑगस्टला त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. असं अदिक तटकरे म्हणाल्या आहेत.
Ladke Daji Yojana | लाडक्या बहिणींना तगडे आव्हान; लाडक्या दाजींसाठी आली खास योजना
आतापर्यंत 1 कोटी 8 लाख महिला लाभार्थी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी राज्य सरकारकडून विविध जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांचा पहिला टप्पा पुण्यामध्ये पार पडला. त्यानंतर आता दुसऱ्या सोहळ्याचे आयोजन नागपूर येथे केले गेले आहे. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ 50 लाखांहून अधिक अर्ज आले असून हे अर्ज दाखल करणाऱ्या महिलांपैकी पात्र ठरलेल्या महिलांच्या खत्यात 3000 रुपये जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. मागील महिन्यात दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळजवळ 1 कोटी 8 लाख पात्र ठरलेल्या महिलांना 3000 रुपये वर्ग करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम