द पॉइंट नाऊ: कुसुमाग्रज संस्थेचे नाव राज्यभर झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत संस्थेकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांत कमालीची घट झाली आहे. कुसुमाग्रज स्मारकात निरनिराळ्या औचित्यांनी लेखक, कलावंतांच्या मुलाखती होत असत. त्यांना मोठा प्रतिसादही लाभत असे. अशी व्याख्याने आता जवळपास बंद झाली आहेत वा ती कोणा अन्य संस्थेच्या ‘संयुक्त विद्यमाने’ आयोजित केली जातात. काही वर्षांपूर्वी रसिकांसाठी प्रायोगिक नाटकांची पर्वणी ठरलेला ‘रंगालय’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र, तोही बंद पडला. पूर्वी स्मारकात शहरातील तीन संस्था काव्यवाचनाचे कार्यक्रम घेत असत. त्यांना प्रतिसादही उत्तम लाभत असे. मात्र, त्यांना प्रतिष्ठानकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर प्रतिष्ठानने ‘रसयात्रा’ हा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. परंतु, तोही काही महिनेच सुरू राहू शकला. ‘लोकमाता गोदावरी’ व ‘सांस्कृतिक नाशिक’ हे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही गुंडाळावे लागले. प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर मात्र ते अद्यापही झळकत आहेत. ‘पाथेय’ हे त्रैमासिकही बंद पडले आहे. एवढे उपक्रम बंद पडण्यामागे निधीच्या कमतरतेचे कारण आहे का, याबाबतही पदाधिकाऱ्यांकडून काही सांगितले जात नाही. त्यामुळे रसिकांना मात्र कार्यक्रमांच्या प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी साधारण ऑगस्टमध्ये होत असते. त्याविषयी बरीच गोपनीयताही बाळगली जाते. प्रतिष्ठानचे एकूण १ हजार ४० आजीव सभासद असूनही सभेला उपस्थिती मात्र पन्नासच्या आतच असते. यंदाची सभा पुढील महिन्यात होणार असून, अद्याप तिची तारीख ठरलेली नसल्याचे सांगण्यात आले.
प्रतिष्ठानातील अनेक कार्यक्रम बंद पडलेली आहेत त्यातीलच काही म्हणजे लोकमाता गोदावरी, सांस्कृतिक नाशिक, पाहतेय त्रैमासिक, रंगालय, रसयात्रा, लेखक, कलावंतांच्या मुलाखती, व्याख्याने.
प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपट, कविता संदर्भातील कार्यक्रम सुरू झाले आहेत.राज्यस्तरीय संगीत स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत. करोना काळात बंद पडलेले उपक्रम हळूहळू सुरू करीत आहोत. वार्षिक सभेची तारीख अद्याप ठरलेली नाही. अशी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम